Nashik Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : 10 हजारांसाठी दिले कोयत्याने ठार मारण्याची धमकी!

Nashik News : नाशिकरोड येथील नॅशनल लॉजमध्ये कामाला असलेल्या युवकाकडे संशयित सराईत गुन्हेगाराने दहा हजार रुपयांची मागणी केली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिकरोड येथील नॅशनल लॉजमध्ये कामाला असलेल्या युवकाकडे संशयित सराईत गुन्हेगाराने दहा हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास कोयत्याने ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सराईत गुन्हेगारासह दोघांविरोधात खंडणीचा गुन्हा नाशिकरोड पोलिसात दाखल करण्यात आला आहे. संशयिताविरोधात यापूर्वीही खुनाचा गुन्हा दाखल आहे. (Threatened to kill given for 10 thousand)

ज्ञानेश्वर मल्लु पवार (रा. गंगाहरि अपार्टमेंट, ज्ञानेश्वर नगर, पाथर्डी फाटा) या युवकाच्या फिर्यादीनुसार, तो नाशिकरोड येथील नॅशनल लॉज याठिकाणी कामाला आहे. सोमवारी (ता. १) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास संशयित रोहन सुभाष जाधव याच्यासह दाऊद शेख, सोनू व गणी असे चौघे नॅशनल लॉज याठिकाणी आले.

त्यावेळी संशयित जाधव याने ज्ञानेश्वर यांच्याकडे १० हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास खाली पोरं उभे असून त्यांच्याकडे कोयता आहे. तुझा याच ठिकाणी कोयता घालून पुण्याला निघून जाईन. (latest marathi news)

माझ्यावर अगोदरचाच खुनाचा गुन्हा आहे. त्यामुळे मला काही फरक पडत नाही, अशी धमकीही दिली. यामुळे भयभीत झालेल्या ज्ञानेश्वर पवार याने नाशिकरोड पोलिसात धाव घेतली आणि तक्रार दिली.

त्यानुसार, संशयितांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित रोहन जाधव याच्याविरोधात २०१७ मधील खुनाच्या गुन्ह्यासह चोरीचे गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक ए.एस. शिंदे हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pension scheme: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पेन्शन हक्कासंदर्भात उच्च न्यायालयाचं निरीक्षण; स्वतःहून नोकरी सोडल्यास...

Mumbai Missing link Project: मिसिंग लिंकच्या बोगद्याखाली गुप्त बोगदा, आव्हानात्मक काम झालं सोपं; भविष्यातही बनणार संकटमोचक!

माफी नंतरही वाद शमेना! धीरेंद्र शास्त्रींची शिवभक्त असल्याचं दाखवण्याची धडपड, शिवरायांचे चित्र असलेला सदरा केला परिधान

Latest Marathi News Live Update : चंद्रपुरात वीजनिर्मिती प्रकल्पातील दोन संच पडले बंद

Shivaji University Hostel food issue : शिवाजी विद्यापीठ वसतिगृहातील जेवणात अळ्या, किडे; शिवसेना आक्रमक, वारंवार घटनेने विद्यार्थ्यांची हेळसांड

SCROLL FOR NEXT