Akshaya Tritiya  esakal
नाशिक

Akshaya Tritiya 2024 : आखाजीची झोक्यावरील गाणी जपण्याची गरज; खानदेशातील माहेरवाशिणींचा महत्त्वाचा सणाची तयारी

Nashik News : साडेतीन मुहूर्तापैकी एक पवित्र सण म्हणजे अक्षय तृतीया (आखाजी) या सणाची पूर्वापार म्हटली जाणारी पारंपरिक झोक्यावरील गाणी संगणक युगात कालबाह्य होत आहेत.

गोविंद अहिरे : सकाळ वृत्तसेवा

नरकोळ : जिल्ह्याच्या कसमादे भागात प्रामुख्याने अहिराणी बोलीभाषा आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक पवित्र सण म्हणजे अक्षय तृतीया (आखाजी) या सणाची पूर्वापार म्हटली जाणारी पारंपरिक झोक्यावरील गाणी संगणक युगात कालबाह्य होत आहेत. आता धावपळीच्या जीवनात झोके व अहिराणी गाणी फारशी दिसत नाही. ती टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. (traditional songs of Akshaya Tritiya festival are out of date)

अहिराणीत आखाजीविषयी अनेक गाणी आहेत. या गीतातून खानदेशातील संस्कृती, जनजीवन, कुटुंब व्यवस्था, सासर-माहेर, नातेसंबंध यांचे असंख्य पदर उलगडून जातात. त्यामुळे आखाजी आणि गाणी यांचे अतूट समीकरण तयार झाले आहे. दरवर्षीची आखाजी ही सासुरवाशिणीसाठी माहेरचा अक्षय आनंद देणारी असते.

परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनात माहेरवासिनीचे माहेर आता मागे पडले आहे. वाढता व्याप यांचे मूळ कारण आहे. पूर्वी या सणासाठी शेती व्यवसायाला विश्रांती म्हणून माहेरी येऊन पंधरा दिवस मनसोक्त गप्पा व आखाजीचे गोडधोड पदार्थ आस्वाद यानिमित्ताने राहत. आता ती कुटुंबपद्धती राहिलेली नाही, तो जिव्हाळाही कुटुंबांमध्ये राहिला नाही.

माहेरी यायचे म्हटले तरी घरचे बघणार कोण असा चौकोनी कुटुंबाचा प्रश्न. शहर आणि खेडेगाव अशा दोन्ही ठिकाणी हा प्रश्न आहे. पूर्वी एकत्र कुटुंबपद्धतीमुळे मात्र माहेरी पंधरा दिवस जाणे सासुरवाशिणीला शक्य होत असे. मनातील रुसवा फुगला यामुळे नातेसंबंध दूर जात असल्याने एकमेकांचे प्रेम कमी होत आहे. (latest marathi news)

पितरांना पूजनाचा दिन

अक्षय्य तृतीया हा त्रेतायुगाच्या वर्षाचा पहिला दिवस, म्हणून अहिराणी संस्कृतीत नव्या वर्षाची कालगणना आखाजीपासूनच होते. खानदेशात याच दिवशी शेतकऱ्याकडून सालदाराची नेमणूक केली जाते. गवराईचा उत्सव व पितरांना ‘आगारी’ टाकायचा दिवस म्हणूनही आखाजीचे महत्त्व आहे. स्वर्गातल्या पितरांचा ‘अक्षय आशीर्वाद’ ही संकल्पना अहिराणी संस्कृतीची म्हणून हा सण अहिराणी संस्कृतीचा प्रमुख सण म्हणून ओळखला जातो.

अक्षय घटाची घागर...

या दिवशी अक्षय्यघट म्हणजे पाण्याची घागर भरली जाते. त्याच्यावर छोटं मातीचंच भांड ठेवून त्यावरती खरबूज आणि दोन सांजऱ्या,, दोन आंबे ठेवतात. छोटं भांडं पितरांसाठी असतं, सकाळी उंबरठ्याचं औक्षण करत पूर्वजांचे स्मरण केलं जाते. उंबऱ्यावर कुंकवाचे एकेक बोट उमटवत एकेका पितराचे नाव उच्चारत त्यांना आमंत्रण दिले जाते. दुपारी चुलीवर (आता गॅसवरच) ‘घास’ टाकतात. आमरस, पुरणपोळी, कटाची आमटी, भजी, कुरडई असा जोरदार बेत असतो.

असे म्हणतात झोक्यावरील गाणे

आथानी कैरी तथानी कैरी कैरी झोका खाय वं ।

कैरी तुटनी खडक फुटना झुयझुय पानी व्हायं वं ॥

झुयझुय पानी व्हाय तठे कसाना बजार वं ॥

झुयझुय पानी व्हाय तठे बांगड्यास्ना बजार वं ॥

माय माले बांगड्या ली ठेवजो, ली ठेवजो

बन्धुना हातमा दी ठेवजो दी ठेवजो ॥

"आजच्या धकाधकीच्या जीवनात माहेरवासिनीचे माहेर मागे पडल्याने झोक्यावरील गाणे कालबाह्य होत आहेत. आता फक्त आठवणी उरल्या आहे. तरुण मुलींना हे गाणे शिकविण्यासाठी जुन्या वयस्कर महिला पुढे येत नसल्याने पूर्वीसारखी मजा सणांमध्ये दिसून येत नाही." - विनिता पवार (शिरसाठ) प्रा.शिक्षिका, निंबोळा, ता.देवळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : परळच्या राजाची गुलाल उधळत मिरवणूक; लालबागचा राजाही मंडपातून निघाला...

Govinda Komkar : वनराजच्या अंत्यविधीलाच टोळीनं घेतलेली शपथ, १९ वर्षीय मुलाला गोळ्या घातल्या; नाना पेठेत काय घडलं?

'लालबाग राजा'च्या मुख्य गेटसमोर 'हिट अँड रन', २ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, एक जखमी

आणखी एका अभिनेत्रीने सोडली 'तू ही रे माझा मितवा' मालिका; तिच्याजागी दिसणार 'ही' गाजलेली अभिनेत्री

Latest Maharashtra News Updates : कल्याणमध्ये भरदिवसा सोनसाखळी चोरली

SCROLL FOR NEXT