Nashik Kalyan Local
Nashik Kalyan Local esakal
नाशिक

Nashik Kalyan Local : नाशिक-कल्याण लोकलची ट्रायल घ्या : केंद्रीय राज्यमंत्री दानवे

सकाळ वृत्तसेवा

Nashik Kalyan Local : गेल्या सात वर्षांपासून बहुप्रतिक्षित असणारा नाशिक-कल्याण लोकल प्रकल्प सध्या ॲक्टिव्ह होण्याच्या मार्गावर आहे. रेल्वेच्या जनशिकायत कार्यालयाने मुंबई विभागाला पत्र पाठवून पुढील कार्यवाही करायला सांगितले आहे. नाशिक-कल्याण लोकलची घाटातील चाचणी घेण्यासाठी आरडीएसओ स्टाफ उपलब्ध करण्याची सूचना राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यामार्फत रेल्वेचे अधिकारी डॉ. जगदीश सकवान यांनी जनशिकायत कार्यालयामार्फत मुंबई विभाग रेल्वेचे जनरल मॅनेजर (सचिव) यांना पत्राद्वारे कळविले आहे. (Nashik Take trial of Nashik Kalyan Local marathi news)

नाशिक-कल्याण रेल्वे प्रकल्प अनेक दिवसांपासून लालफितीत अडकला आहे. लोकप्रतिनिधींची उदासीनता आणि रेल्वे खात्याची निष्क्रियता यामुळे या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखविला जात नाही. घाटातून रेल्वे लोकल धावण्यासंदर्भात लखनौच्या आरडीएसओ कार्यालयाच्या चाचणीची आजपर्यंत वाट पाहिली जात होती. ‘आरडीएसओ’चे कर्मचारी आजपर्यंत उपलब्ध होत नव्हते.

या संदर्भात नाशिकचे भूमिपुत्र आणि या प्रकल्पाचे जन्मदाते निवृत्त लोको निरीक्षक वामन महादेव सांगळे यांनी या संदर्भात पन्नासहून अधिक वेळा तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत जनशिकायत कार्यालयामार्फत मध्य रेल्वेच्या सचिवांना पत्र प्राप्त झाले आहे.

या संदर्भात पुढील कार्यवाही लवकरात लवकर करून त्याची माहिती पुन्हा जनशिकायत कार्यालयाने मागविली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेचे अधिकारी सध्या कार्यरत होऊन आरडीएसओ इन्स्पेक्शनसाठी सरसावलेले आहेत. निवडणुकीपूर्वी हा प्रकल्प कार्यान्वित व्हावा, अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे. (latest marathi news)

ही लोकल सुरू झाल्यावर विद्यार्थी, नोकरदार, लहान-मोठे व्यावसायिक यांना कनेक्टिव्हिटीला सोपे जाणार आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना आपला पिकवलेला भाजीपाला मुंबईपर्यंत नेऊन त्याला हायटेक बाजारपेठ मिळणार आहे. नाशिकच्या सर्वांगीण कनेक्टिव्हिटीला नाशिक-कल्याण लोकल प्रकल्प हा दिशादर्शक ठरेल, असे मत विकासकांनी व्यक्त केले आहे.

पस्तीस कोटी पाण्यात

नाशिकचा विकास साधणारी नाशिक-कल्याण लोकल ३५ कोटी रुपये खर्च करून पंधरा महिन्यांपूर्वी चेन्नईच्या कारखान्यात तयार झाली. नंतर ती मुंबईत कुर्ला कार शेड येथे येऊन आधुनिकीकरण होऊन तयार झाली. मात्र, अजूनही ती धूळखात पडलेली आहे. चाचणीसाठी नऊ लाखांचा निधी मंजूर होऊन चाचणीची तयारी झाली असतानाच ही लोकल स्थगित करण्यात आल्याने तीव्र नाराजी व्यक्त झाली होती.

ही गाडी सुरू करावी, यासाठी सह्यांची मोहीम नाशिककरांनी राबविली. वामन सांगळे यांनी या लोकलला नागरिकांचे समर्थन मिळविण्यासाठी सह्यांची मोहीम घेतली. या सह्यांसह मागणीचे निवेदन पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना वामन सांगळे यांनी पाठविले होते.

''घाटातून जालना गाडी धावते. त्या गाडीला केवळ दोन मोटार कोच आहे. आपल्या नाशिक-कल्याण लोकलला सहा मोटार कोच आहे. मग गाडी चालवायला काय अडचण आहे. ही राजकीय व प्रशासकीय उदासीनता आहे. ५० हून अधिक तक्रारी केल्या, आता ट्रायल होण्याची आशा आहे, नाहीतर जनतेचे १०५ कोटी रुपये पाण्यात जातील. नाशिककरांना रेल्वेकडून पुन्हा हुलकावणी मिळेल.''- वामन सांगळे, संकल्पना, नाशिक-कल्याण लोकल

''शेतकरी, नोकरदार आणि महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना कनेक्टिव्हिटी निर्माण करण्यासाठी हा रेल्वे लोकल प्रकल्प महत्त्वकांक्षी ठरणार आहे. त्यामुळे शासनाने वंदे भारत ट्रेन कार्यान्वित केली तशीच नाशिक-कल्याण लोकल कार्यान्वित केल्यास इतर गाड्यांवरचा भार कमी होऊन गाड्यांमध्ये गर्दी होणार नाही. नाशिककरांना अजून एक हक्काची लोकल मिळेल.''- मनोज म्हस्के, सामाजिक कार्यकर्ते, एकलहरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल; संजय राऊत यांचा दावा

Fact Check: भाजप एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण रद्द करेल, असा दावा करणारा अमित शहांचा व्हायरल व्हिडिओ एडिटेड

Pakistan Team coach : मोठी बातमी! भारताला World Cup मिळवून देणारा गुरू बनला पाकिस्तानचा कोच, PCB ने दिले अपडेट

Latest Marathi News Live Update : कल्याणमध्ये होणार नरेंद्र मोदींची जाहीर सभा

संतापजनक! वन-वे रोडवर रिक्षा चालकाने अचानक यू-टर्न घेतला अन् तरुणाचा जीव गेला; पाहा धक्कादायक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT