Nashik Unseasonal Rain Damage esakal
नाशिक

Nashik Unseasonal Rain Damage: गारपीटीने 10 हजार 600 हेक्टरवरील पिकांचे नुकसान! निफाड तालुक्यात 22 हजार शेतकरी‌ बाधित

सकाळ वृत्तसेवा

निफाड : गारपीट व अवकाळी पावसामुळे निफाड तालुक्यातील दहा हजार सहाशे हेक्टरवरील द्राक्ष, कांदा, ऊस, गहू व मका या पिकांना मोठा फटका बसला आहे. तालुक्यातील २२ हजार शेतकरी गारपीटीने बाधित झाले आहेत.

विधा‌नसभेच्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री गारपीटग्रस्तांच्या मदतीबाबत काय निर्णय घेतात, याकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (Nashik Unseasonal Rain Damage Damage to crops on 10 thousand 600 hectares due to hail 22 thousand farmers affected in Niphad taluka)

तालुक्यातील कसबे सुकेणे, पिंप्री रौळस, कोठुरे, रसलपूर, निफाड, सोनेवाडी, कुंदेवाडी, शिवडी, विंचूर, लासलगाव, नांदुर्डी, खेडे, उगाव, पानेवाडी, पिंपळस, गोंडेगाव फाटा, चांदोरी यासह सुमारे पन्नासवर गावांत गारपीटीने शेतातील‌ द्राक्ष, कांदा, गहू, हरभरा, मका व टोमॅटो या पिकांची नासाडी झाली.

द्राक्ष, कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले. पालकमंत्री दादा भुसे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी गारपीटीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर महसूल व कृषी विभागाने संयुक्तपणे पंचनामे केले.

निफाड तालुक्यात झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनला सादर झाला आहे. त्या अहवालानुसार तालुक्यातील १० हजार ६०० हेक्टरवरील द्राक्ष, कांदा, ऊस, मका, टोमॅटो, गहू हरभरा या प्रमुख पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे.

तालुक्यातील २२ हजारांवर शेतकरी बाधित झाले आहेत. पंचनामे झाल्याने आता गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष विधानसभेचे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेश‌नाकडे लागले आहे. अधिवेशनात गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबत निर्णय घेणार असल्याचे राज्यकर्त्यांनी सांगितले आहे.

"निफाड तालुक्यात गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी विभागाने संयुक्तपणे पूर्ण केले आहेत. त्यानुसार निफाड तालुक्यातील दहा हजार ६०० हेक्टरवरील द्राक्ष, कांदा, ऊस, गहू, टोमॅटो, हरभरा यासह इतरही पिकांचे नुकसान झाले आहे. २२ हजार शेतकरी‌ बाधित झाले आहेत. त्याचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविला‌ आहे."

-शरद घोरपडे, तहसीलदार, निफाड

"गारपीटीने झालेल्या नुकसा‌नीची मोठी झळ द्राक्ष बागायतदारां‌ना बसली आहे. लहान मुलाप्रमाणे वर्षभर बागेचे संगोपन केले. मात्र, द्राक्षाचे पीक हातातोंडाशी येण्याचा काळ अन्‌ गारांचा मारा. यामुळे द्राक्ष शेतीत करिअर करू पाहणाऱ्या तरुणांमध्ये मोठे नैराश्य आले आहे. डोक्यावर लाखोंचे कर्ज अन्‌ डोळ्यासमोर गारपीटीने निष्पर्ण झालेल्या द्राक्षबागा हे विदारक चित्र हजारो शेतकऱ्यांनी अनुभवले आहे. यातून पुन्हा उभे राहण्यासाठी भरीव मदतीसह गारपीटग्रस्तांची कर्जमाफी करणे गरजेचे आहे."

-ॲड. रामनाथ शिंदे, संचालक, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागयतदार संघ पुणे, विभाग नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

Success Story: शेतकरी कुटुंबातील मुलाची 'एनडीएत' भरारी; अमेय साळुंखेंचा देशात 34 वा क्रमांक, लहानपणीच पितृछत्र हरपलं, आईने कष्टाने वाढवलं..

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

SCROLL FOR NEXT