सिन्नर : शहर व तालुक्यातील अनेक गावांत अवकाळी पावसाने झोडपून काढले. खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेली पिके भुईसपाट झाली आहेत. रब्बी हंगामातील कांदा, गहू, द्राक्ष पिकाला फटका बसला आहे. (Nashik Unseasonal Rain Damage to crops due to unseasonal rain in Sinnar taluka Farmer tensed)
दोन दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांना धास्ती लागली होती. काही भागात कांदा लागवडीला सुरवात झाली होती. कांदा लागवडीसाठी तयार झालेली रोपे, काही ठिकाणी आंब्याला आलेला मोहर, द्राक्षबागावर पाऊस बरसला आणि होत्याचे नव्हते झाले.
शनिवारी (ता. २५), रविवारी (ता. २६) व सोमवारी (ता. २७) दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची त्रेधा तिरपीट उडवली. पावसामुळे खरीप हंगामातील काढणीला आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. कांदा व गव्हाचे नुकसान झाले.
मका चारा- पेंढा, डोंगर उतारावरील चारा म्हणून वापरले जाणारे गवत, कांदा रोपे वाया गेली आहेत. मुसळधार पावसाने अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरून घरातील वस्तू, धान्य भिजल्याने खराब झाले आहे.
"शेतीमालाचे कमी झालेले भाव व अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. थोडा वेळ, पण मुसळधार झालेला पाऊस शेतकऱ्याला उद्ध्वस्त करून गेला. लवकर लवकर शासनाने पंचनामे करून शेतकऱ्याला आधार द्यावा. योग्य ती मदत करावी."
-कृष्णाजी भगत, अध्यक्ष, सिन्नर सार्वजनिक वाचनालय
तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश
"आधिच आपल्यावर दुष्काळाचे संकट असतांना. आता झालेल्या अवकाळी गारपिटमुळे उरला सुरला घास गमावण्याची वेळ शेतकरी बाधवांवर आली आहे. या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असुन तात्काळ या सर्व नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश मा. तहसिलदारांना देण्यात आले आहे मि आपला कुटुंबप्रमुख म्हणुन सदैव आपल्या सोबत आहे."- अॅड. माणिकराव शिवाजीराव कोकाटे, आमदार सिननर विधानसभा
पंचनामे सुरू
"दोन दिवसापासून सिन्नर तालुक्यात पाऊस सुरू असल्यामुळे ज्या ज्या गावात पाऊस झालेला असून त्या गावात अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे. शेतकरी वर्गांच्या बांधावर जाऊन अधिकारी पंचनामे करीत आहे."-सुरेंद्र देशमुख, तहसीलदार सिननर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.