Rain water accumulated in fields in Nanduri area. esakal
नाशिक

Nashik Unseasonal rain News : नांदुरी, सप्तशृंगगड परिसरास वादळासह पावसाने झोडपले

Nashik News : नांदुरी, सप्तश्रृंगगड परिसरात आज दुपारी साडेचारच्या सुमारास अचानक वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली.

योगेश सोनवणे : सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव : नांदुरी, सप्तश्रृंगगड परिसरात आज दुपारी साडेचारच्या सुमारास अचानक वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. अतिपावसामुळे सप्तशृंगगड घाट रस्त्यात लहान-मोठे दगड पडले होते. नांदुरी-सप्तशृंगगड मार्गावर व्यावसायिकांनी थाटलेल्या दुकानांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. (Unseasonal rain with storm in Nanduri Saptshringigarh area)

बुधवारी (ता. ८) दुपारपासूनच आकाशात ढग जमा व्हायला सुरवात झाली होती. परिसरात मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता. दुपारी साडेचारच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. घाट परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळल्याने रस्त्यावरून पाणी वाहत होते.

या वेळी देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांची मोठी तारांबळ उडाली. वादळी वाऱ्यामुळे दुचाकीस्वारांची मोठी धावपळ झाली. या दरम्यान सप्तशृंगगड घाट परिसरातील काही भागात अतिपावसामुळे लहान-मोठे दगड पडले होते. पावसाचे रौद्र रूप पाहून गडावरून देवी दर्शन घेऊन परतणारी काही मोठी वाहने घाट रस्त्यातून पुन्हा गडाकडे परतली. (latest marathi news)

रस्त्यावर झाडाच्या फांद्या पडलेल्या पाहायला मिळाल्या. नांदुरी परिसरात पोलिस प्रशासनाने चैत्र यात्रा व उन्हाळी सुट्यांत भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन वाहतुकीच्या दृष्टीने उभारलेले बॅरिकेड्‌स वादळी वाऱ्याने मुख्य रस्त्यावर अस्ताव्यस्त झाल्याचे दिसत होते. घाट परिसरात दगड पडल्याने काही काळ सप्तशृंगगड घाट रस्ता पोलिस प्रशासनातर्फे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.

त्यानंतर आपत्कालीन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरील दगड बाजूला करीत घाट रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला केला होता. नांदुरी परिसरातील शेतांमध्ये पावसाचे पाणी साचल्याचेही पाहायला मिळाले. पावसाळा सुरू झाल्याचा भास काही काळ परिसरातील शेतकऱ्यांना होत होता. महिनाभरातील उकाड्यापासून परिसरातील नागरिकांना बुधवारी झालेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राम मंदिर देणगी वाद! ३५०० कोटी रोकड, सोन्या-चांदीचे रेकॉर्ड गायब; ६ वर्षांपूर्वी व्यवस्थापनाबाबत व्यक्त केलेली चिंता, ४ गंभीर त्रुटी

Ahilyanagar Crime: मतिमंद मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला ‘नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेप’; अहिल्यानगर न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

Nilesh Lanke: सात-बारा कोरा करा; अन्यथा मंत्रालयावर मोर्चा, नीलेश लंके यांचा सरकारला इशारा; तहसील कार्यालयावर एल्गार

Koyna Dam History : कोयना धरणाचे पाणी ओसरले अन् उघड झाला पाण्याखाली लपलेला इतिहास; भग्न अवशेषांमधून समोर आलं जुनं वैभव, 74 वर्षांनंतर काय पाहायला मिळालं?

Mumbai Local: ए... दरवाजा बंद कर! लोकलमध्ये वादानंतर चाकूने भोसकलं, २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू; डब्यात रक्ताचा सडा

SCROLL FOR NEXT