Cotton crop waiting for rain in Kalwadi area. esakal
नाशिक

Nashik Monsoon Delay : मालेगाव तालुक्यात पावसाची प्रतिक्षा; पावसाअभावी 24 टक्के पेरण्या खोळंबल्या

Nashik News : तालुक्यातील काटवणसह माळमाथ्यावर जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर सर्वत्र खरीपाची पेरणी झाली.

संदीप पाटील

Nashik News : तालुक्यातील काटवणसह माळमाथ्यावर जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर सर्वत्र खरीपाची पेरणी झाली. पेरणीनंतर कोळपणीदेखील झाली. काही ठिकाणी निंदणीला सुरवात झाली आहे. परंतु, पिके चांगली असताना पावसाने दडी मारली आहे. पावसाअभावी पिके कोमजायला सुरवात झाली आहे. दमदार पावसाच्या प्रतिक्षेत शेतकरी आहेत. (Waiting for rain in Malegaon taluka)

तालुक्यात केवळ ७६ टक्के पेरण्या झाल्या आहेत. उर्वरित २४ टक्के पेरण्या समाधानकारक पावसाअभावी खोळंबल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून खरीप हंगामातील पिके मशागतीला सुरवात झाली. पण, पाऊस गायब झाल्याचे चित्र माळमाथा परिसरात दिसत आहे. मका, कपासी, बाजरी, भूईमूग, कडधान्ये सोबतच भाजीपाला पिके परिसरात घेतली जातात. मागील वर्षी दुष्काळाने होरपळून निघाल्याने यंदा चांगल्या पावसाची अपेक्षा होती.

पावसाने सुरवातीला जोरदार हजेरी लावली. परंतु, विहिरींना पाणी उतरले नाही. परिणामी, पिकांना पाणी देता येत नाही. तुरळक विहिरींना पाणी उतरले असून, शेतकऱ्यांनी पाणी भरायला सुरुवात केली आहे. पावसाच्या अनियमित पणाने महागडी बियाणे, खते, पेरणी खर्च वाया जाऊ नये, अशी अपेक्षा परिसरात शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

गेल्या वर्षीच्या दुष्काळाने पिकच आली नव्हती. परिणामी, दैनंदिन खर्च देखील मुश्कील झाल्याची चर्चा आहे. तालुक्यातील खरीपाचे क्षेत्र ९५ हजार २७८ हेक्टर आहे. आजअखेरपर्यंत ७२ हजार ५६८ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. तालुक्यात पेरणीची सरासरी ७६.१६ टक्के आहे. मका, बाजरी व कपाशी प्रामुख्याने लागवड केली जात आहे. (latest marathi news)

"मागील वर्षीचा भीषण दुष्काळाने झालेला कर्जाचा डोंगर, यंदा उसनवारी करून केलेला पेरणी खर्च दमदार पावसाने भरून निघेल, अशी अपेक्षा असताना पावसाच्या दडीने शेतकरी हवालदिल झाला आहे. येत्या आठवड्यात पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीला सामोरे जावे लागेल." - सुनील पगार, शेतकरी, कजवाडे

दमदार पाऊस झाल्यास दुबार पेरणीचे संकट टळेल

मालेगाव तालुक्यात सर्वत्र दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. तालुक्यातील दहापैकी कुकाणे मंडळात आज अखेर सर्वात कमी ५४.९ मिलीमीटर एवढाच पाऊस झाला आहे. मालेगाव मंडळात २२५, दाभाडी ११९, वडनेर २०३, करंजगव्हाण १८०, झोडगे १६५, कळवाडी १८२, सौंदाणे १४०, सायने १९१ व निमगाव मंडलात १५८ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४५७.७ मिलीमीटर आहे. आतापर्यंत तालुक्यात १५८.२ मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे. या वर्षी तीन महिने कडक ऊन पडले. जमीन तापली होती. त्यामुळे सुरुवातीच्या पावसाने केवळ उकाडा कमी झाला. दमदार पाऊस झाला तर दुबार पेरणीचे संकट टळू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT