There is a shortage of water in many villages of the district. In the hot summer, women are filling water jugs. esakal
नाशिक

Nashik Water Shortage : जिल्ह्यात टँकरची त्रिशतकाकडे वाटचाल पाणीसाठा घटला; 11 दिवसांत वाढले 30 टॅंकर

Water Shortage : एप्रिलमध्येच टॅंकरचे त्रिशतक झाले असल्याने मेमध्ये पाण्याची आणखी भयावह परिस्थिती निर्माण होईल.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Water Shortage : जिल्ह्यात उष्णतेची लाट आलेली असताना झपाट्याने पाण्याचा साठा घटत चालला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने गावोगावी पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने एकाच वेळी पाण्याची मागणीही वाढू लागली. त्यामुळे जिल्ह्यात ११ दिवसांत तब्बल ३० टॅंकरची मागणी झाली आहे. जिल्ह्यातील २७३ गावे व ६५५ वाड्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून, पाच लाख ३८ हजार ७६३ नागरिक व दोन लाख जनावरांची तहान २८६ टँकरद्वारे भागविली जात आहे. ( Tankers move towards three hundred in district water stock has decreased )

एप्रिलमध्येच टॅंकरचे त्रिशतक झाले असल्याने मेमध्ये पाण्याची आणखी भयावह परिस्थिती निर्माण होईल. गेल्या वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने धरणे, छोट्या-मोठ्या तलावांमध्ये पुरेसा साठा झालेला नाही. तसेच, दिवसेंदिवस उन्हाळा अधिक वाढत असल्याने भूगर्भातील पाणीपातळी खालावत चालली आहे. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला.

जिल्ह्यातील काही गावांना वर्षभरापासून टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढू लागली. २९ मार्चअखेर आठवड्यात २०६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. ६ एप्रिलला यात वाढ होऊन टॅंकरची संख्या २२६ वर पोहोचली.

१८ एप्रिलला जिल्ह्यातील २३३ गावे आणि ५३५ वाड्या अशा ७६८ ठिकाणी २५६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. २९ एप्रिलला यात वाढ होऊन टॅंकरची संख्या २८६ वर पोहोचली आहे. यात सर्वाधिक ६९ टँकर नांदगाव तालुक्यात, तर ४७ टँकर येवला तालुक्यात तहान भागविण्याचे काम करीत आहेत.(Latest Marathi News)

महिनाभरात वाढले ८० टॅंकर

टंचाईचे संकट गडद होत असल्याने महिनाभरात तब्बल ८० टॅंकर वाढलेले आहेत. २९ मार्चला जिल्ह्यात २०६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. महिनाभरात म्हणजे २९ एप्रिलला यात तब्बल ८० ने वाढ होऊन ती संख्या २८६ वर पोहोचली आहे. मेमध्ये टॅंकरची संख्या ही चारशे पार होण्याचा अंदाज ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने वर्तविला.

पाणीपुरवठ्यासाठी १४८ विहिरी अधिग्रहीत

दुष्काळग्रस्त असलेल्या ३४ गावांना तसेच ११४ ठिकाणी टॅंकरसाठी १४८ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यात बागलाण (३८), चांदवड (५), देवळा (३५), कळवण (१५), मालेगाव (४१), नांदगाव (४), सुरगाणा (४), येवला तालुक्यासाठी (६) विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत.

टँकरद्वारे सुरू असलेली गाव-वाड्या व लोकसंख्या

तालुका गाव-वाड्या सुरू असलेले टॅंकर

बागलाण ३६ ३५

चांदवड ९३ ३१

देवळा ६२ ३५

इगतपुरी १ १

कळवण १५ -

मालेगाव १२७ ३६

नांदगाव ३४० ६९

नाशिक १ १

सिन्नर १५९ १७

सुरगाणा १५ ८

येवला ७९ ४७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Latest Maharashtra News Updates : पंचगंगा नदीची पाणी पातळी चोवीस तासांत सहा फूट सहा इंचांनी वाढली

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

Kolhapur Chappal Prada : ‘प्राडा’ची टेक्निकल टीम कोल्हापुरी पायतान बघून भारावली, कारागिरांची हस्तकला पाहून म्हणाले...

SCROLL FOR NEXT