baby feet.jpg 
नाशिक

मैलो न मैल अखंड प्रवास..अन् भररस्त्यात सुरू झाल्या प्रसूती वेदना..मग...

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : लॉकडाउन वाढतच गेल्याने राज्यात अडकून पडलेले मजूर मिळेल, त्या वाहनाने काहीच नाही, तर पायी चालत आपल्या गावाकडे जात आहेत. अनेक परप्रांतीय मजूर रात्रंदिवस राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय मार्गावरून जात आहेत. दोन- तीन दिवसांपासून त्यांच्या संख्येत वाढच होत आहे. अशातच उद्याचे भवितव्य उराशी बाळगून आपल्या मुळगावी परततानाच तिला  प्रसुती वेदना सुरू झाल्या...मग...

गोंडस बाळाला दिला जन्म

नाशिक शहरातून मध्य प्रदेशातील सतना या आपल्या मुळ गावी पायी परतत असताना एका गरोदर महिलेची प्रसुती झाली आहे. या महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला असून बाळ व आई सुखरूप असल्याची माहिती पोलीसांनी दिली . भररस्त्यात या महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि रस्त्यातच तिची प्रसुती झाली. शकुंतला नावाच्या महिला या नाशिकमध्ये आपल्या परिवारासोबत राहतात. मात्र त्यांचे मूळ गाव हे मध्यप्रदेशातील असून लॉकडाऊनमध्ये अडकल्याने त्यांनी कुटुंबासोबतच पायी जाऊन मूळगावी राहण्याचा निर्णय घेतला आणि मग प्रवास सुरू केला.

लहान मुले, वृद्ध यांच्या नशीबीही पायपीट

आपल्या मुळगावी परतण्यासाठी काहींनी दुचाकीवरून आपल्या गावी जाण्याचा मार्ग निवडला आहे. तर काही पायीच निघाले आहेत. लहान मुले, वृद्ध यांच्या नशीबीही पायपीट आली आहे. गावी निघालेल्या या नागरिकांना रस्त्यात काही ठिकाणी सेवाभावी संस्थांकडून अन्नदान मिळत आहे. काहींनी तात्पुरती खाण्याची व्यवस्था केली आहे. उन्हाळा असल्याने पाण्याची आवश्‍यकता भासत असल्याने मिळेल तेथून पाण्याच्या बाटल्या भरून त्या सोबत ठेवत आहेत. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT