Cyber Crime esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : वर्क फ्रॉम होम, शेअर मार्केट ट्रेडिंगचे आमिष भोवले; सायबर भामट्याने घातला 37 लाखांना गंडा

Latest Fraud Crime News : वर्क फ्रॉम होमचे आमिष दाखवून तर, महिलेस शेअर मार्केट ट्रेडिंगमधून जादा परताव्याचे आमिष दाखवून दोघांना तब्बल ३७ लाखांचा गंडा घातला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सायबर भामट्यांनी टेलिग्रामच्या माध्यमातून एकाला वर्क फ्रॉम होमचे आमिष दाखवून तर, महिलेस शेअर मार्केट ट्रेडिंगमधून जादा परताव्याचे आमिष दाखवून दोघांना तब्बल ३७ लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी शहर सायबर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारकाराच्या फिर्यादीनुसार, १५ जुलै ते ३१ ऑगस्ट यादरम्यान, सायबर भामट्याने हार्वे नॉर्मन कंपनीच्या टेलिग्राम आयडीवरुन संपर्क साधला असता, कमीतकमी गुंतवणूक करुन घरबसल्या वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून जादा आर्थिक लाभ घ्या, त्यासाठी टास्क पूर्ण करावे लागतील, असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. ( Work from home share market trading lured by cyber crooks cheated 37 lakhs)

सायबर भामट्याच्या आमिषाला भुलून तक्रारदाराने तब्बल २० लाख ३७ हजार रुपयांची गुंतवणूक केली. सुरुवातीला परतावा मिळाल्यावर काही दिवसांत सायबर भामट्याने संपर्क बंद केल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शहर सायबर पाेलीस ठाणे गाठत तक्रार दिली. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.

महिलेची फसवणूक

महिला तक्रारदाराच्या फिर्यादीनुसार, सायबर भामट्यांनी त्यांना सोशल मिडियाद्वारे संपर्क साधत, एसएमसी सिक्युरिटीज आणि व्हॉटसअप ग्रुपमधील शिवांगी अग्रवाल, महेश गुप्ता यांनी संपर्क साधून लिंक शेअर केली होती. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग केल्यास दररोज, दरमहा आर्थिक परतावा खात्यात क्रेडीट होईल असे आमिष दाखविले.

ग्रुपमधील अनेकांना आर्थिक फायदा झाल्याचे व्हिडीओज व प्रतिक्रियाही त्यांना पाठविल्या. त्यावर महिलेने विश्वास ठेवत, १७ लाख १० हजार सायबर भामट्याने सांगितलेल्या वेगवेगळ्या खात्यांवर वर्ग केले. त्यानंतर, परतावा मिळत नसल्याने त्यांनी संपर्क साधल्यावर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी शहर सायबर पोलिसात गुन्हा दाखल असून, तपास वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : बापरे! आज अचानक सोनं-चांदी इतकी का वाढली? चांदीने तर इतिहास रचला; पाहा तुमच्या शहरातील आजचे ताजे भाव

छावा सिनेमावर टीका केल्यानं ए. आर. रहमान वादाच्या भोवऱ्यात, अभिनेत्री कंगना राणौत पोस्ट शेअर करत म्हणाली...'तुमच्यासारखा माणूस...'

Pollution : ‘प्रदूषणामुळे दर वर्षी दहा लाख मृत्यू’; जागतिक बँकेच्या अहवालावरून जयराम रमेश यांची केंद्रावर टीका

Kolhapur ZP Election : अर्ज भरण्यासाठी फक्त तीन दिवस शिल्लक; झेडपी निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर पक्षांतर शक्य!

जय शाह संतापले, बांगलादेशला फायनल वॉर्निंग! गप्प खेळा, अन्यथा T20 World Cup मधून बाहेर फेकू, बदल्यात 'या' संघाला खेळवण्याची तयारी

SCROLL FOR NEXT