road construction esakal
नाशिक

Nashik Code Of Conduct : जिल्ह्यातील 850 हून पाणंद रस्त्यांची कामे ठप्प! निवडणूक आचारसंहितेच्या कचाट्यात अडकली कामे

Code Of Conduct : जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतून मातोश्री पाणंद रस्ते योजनेतून तब्बल ९८८ शिवार रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Code Of Conduct : जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतून मातोश्री पाणंद रस्ते योजनेतून तब्बल ९८८ शिवार रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. या रस्त्यांना २०२१ व २०२२ मध्ये मंजुरीही मिळाली. मात्र, आतापर्यंत केवळ शंभरच्या आसपास कामांना सुरवात झाली आहे. ही मंजूर कामे सुरू होण्याची अडचण असताना या नवीन आर्थिक वर्षात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील इतर कामे सुरू असल्याचे कारण देत गटविकास अधिकारी स्तरावरून पाणंद रस्त्यांची कामांना परवानगी नाकारली जात आहे. ( Works on more than 850 Panand roads in district have been stopped)

यातच, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याचे सांगत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ८५० हून अधिक कामे ठप्प आहेत. राज्य सरकारने २०२१ मध्ये मातोश्री पाणंद रस्ते योजना सुरू केली. या योजनेतील कामे रोजगार हमी योजनेतून करण्याचे निश्‍चित केले. त्यानुसार ६० टक्के कामे मजुरांकडून, तर ४० टक्के कामे यंत्राने करण्याचे निश्‍चित करून रोजगार हमीमंत्र्यांनी या योजनेतील कामांना मंजुरी दिली.

त्यानंतर जिल्हा परिषद स्तरावर जानेवारी २०२२ मध्ये कार्यारंभ आदेश दिले. त्यानंतरही मार्च, एप्रिल व जून २०२२ मध्ये आणखी कामे मंत्रालयस्तरावरून मंजूर करून त्याच्या याद्या जिल्हा परिषदेकडे पाठवल्या. त्यानुसार मातोश्री पाणंद रस्ते योजनेतून जिल्ह्यात ९८८ कामे मंजूर झाली असून, त्यातील केवळ १०० कामे आतापर्यंत सुरू झाली आहेत. (latest marathi news)

त्यात १ जानेवारी २०२३ पासून केंद्र सरकारने रोजगार हमी योजनेतून करण्यात येणाऱ्या सार्वजनिक लाभाच्या योजनांमध्ये काम करणाऱ्या मजुरांची दोनवेळा ऑनलाइन हजेरी घेणे बंधनकारक केले आहे. त्यातच ग्रामीण भागात ॲपद्वारे हजेरी नोंदवण्यासाठी इंटरनेटची रेंज नसणे, ॲपवर फोटो अपलोड करण्यास अडचणी येणे व फोटो अपलोड केले तरी त्याची ॲपवर नोंद न होणे आदी कारणांमुळे या शिवार रस्त्यांच्या कामांचा वेग मंदावला आहे.

गेल्या वर्षभरात ६०:४० चे प्रमाण राखण्याच्या नावाखाली नवीन पाणंद रस्ते सुरू करण्यास गटविकास अधिकाऱ्यांनी परवानगी दिली नाही. जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर मातोश्री पाणंद रस्ते योजनेतील रस्त्यांची कामे सुरू करण्यास व्हेंडरला परवानगी द्यायची नाही, असा अलिखित नियम केला की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

त्यामुळे नवीन रस्त्यांची कामे सुरू झाली नाही. यंदा नवीन वर्षात कामे सुरू करण्यासाठी सरपंच तसेच व्हेंडर गटविकास अधिकारी यांच्याकडे चकरा मारत असताना त्यांना आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे कामे सुरू करण्यास परवानगी देता येणार नाही, असे उत्तर दिले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Reaction On Bihar Voting : बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील विक्रमी मतदानावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया आली समोर, म्हणाले...

Bus and Milk Tanker Accident : बस अन् दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक; एका मुलासह तिघांचा मृत्यू, १७ प्रवासी जखमी

पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे प्रकल्पाला वेग; तीन टप्प्यात पूर्ण होणार, वैशिष्ट्ये काय आहेत?

Bihar Election 2025 Voting : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ऐतिहासिक मतदान!

Akola Raid : लाच घेताना महिला लिपिक रंगेहात पकडली; अकोला एसपी कार्यालयात एसीबीचा छापा!

SCROLL FOR NEXT