Yashwantrao Chavan Maharashtra Open University esakal
नाशिक

Nashik YCMOU News : ‘मुक्त’तर्फे 115 शिक्षणक्रमांच्या परीक्षा शुक्रवारपासून

Nashik News : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या उन्हाळी सत्र लेखी परीक्षांना सुरवात होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या उन्हाळी सत्र लेखी परीक्षांना सुरवात होत आहे. विविध ११५ शिक्षणक्रमांच्‍या परीक्षा शुक्रवार (ता. २४) पासून सुरू होत असून, त्या १२ जूनपर्यंत पार पडणार आहेत. राज्‍यात मुक्त विद्यापीठाच्या विविध ६०१ परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे. (Yashwantrao Chavan Maharashtra Open University)

राज्‍यभरातून मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रावर प्रवेश घेतलेले सुमारे चार लाख ८९ हजार ६६० विद्यार्थी परीक्षा देत आहेत. परीक्षा सुरळीत होण्यासाठी विद्यापीठामार्फत विविध भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. परीक्षा आयोजनाच्या सर्व मार्गदर्शन सूचना विभागीय केंद्रांमार्फत अभ्यास केंद्रांना दिल्‍या असून, विद्यार्थ्यांसाठी मदत यंत्रणाही कार्यरत आहे.

विद्यापीठाच्या संकेतस्‍थळावर मे २०२४ परीक्षेची संपूर्ण माहिती उपलब्‍ध करून दिली आहे. या संकेतस्थळाला विद्यार्थ्यांनी अद्ययावत माहितीकरिता वेळोवेळी भेट देण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले असून, विद्यार्थ्यांनी ते पोर्टलवरून डाउनलोड करून घ्यावे. (latest marathi news)

त्याचप्रमाणे हॉल तिकिटावर नमूद केलेली तारीख आणि वेळेनुसारच परीक्षा द्यावयाची आहे. मुक्त विद्यापीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी नोकरी, व्यवसाय, पोलिस, सैनिक, गृहिणी, शिक्षक इत्यादी विविध घटकातील आहेत. विविध ११५ शिक्षणक्रमांचा विविध विषय मिळून तब्बल तीस लाखांहून अधिक उत्तरपत्रिका लिहिल्या जातील.

कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजित वेळापत्रकानुसार विद्यापीठाच्या परीक्षा सुरू होत असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT