Hemant Gorakhnath Kadalag esakal
नाशिक

Nashik News : जोपूळ शिवारात पालखेड धरण कालव्यात पोहण्यासाठी गेलेला युवक वाहून गेला...

Nashik : तरुण बुडून वाहून गेल्याची घटना घडली असून याबाबत सायंकाळी उशिरा पर्यंत युवकाची शोध मोहीम सुरू आहे,

दिगंबर पाटोळे, सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जोपूळ, ता. दिंडोरी शिवारात पालखेड धरणाच्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या तरुण बुडून वाहून गेल्याची घटना घडली असून याबाबत सायंकाळी उशिरा पर्यंत युवकाची शोध मोहीम सुरू आहे, मात्र उद्याप पर्यंत युवक मिळून आलेला नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. याबाबतची घटना अशी की, पालखेड धरणातून सध्या आवर्तन सोडण्यात आलेले असल्याने पालखेड धरणाच्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. (youth who went to swim in Palkhed dam canal got washed away )

हेमंत गोरखनाथ कडलग, वय २६ हे रा. पाचोरेवणी, ता. निफाड सध्या रा. अशोक नगर सातपूर हे जोपूळ येथे मामा व सासरे बाळासाहेब जाधव यांच्याकडे आले होते. तसेच त्यांची जोपूळ येथे शेत जमिनही आहे. दुपारी साडे चार वाजेच्या दरम्यान पालखेड धरणाच्या कालव्यास पाणी सोडले असल्यामुळे दुपारी पोहण्यास गेले होते.

पोहताना कालव्याच्या पाण्याचा वेग, कालव्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडून वाहून गेले याबाबतची माहिती कळल्यानंतर आसपासच्या शेतकरी व युवकांनी पाठात शोध घेण्याचा प्रयत्न करून याबाबतची माहिती वणी पोलिसांना कळवली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून स्थानिक पोहणाऱ्या युवकांच्या मदतीने मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. तसेच उशिरा सायखेडा येथील आपत्ती व्यवस्थापन पथकास पाचारण करण्यात आल्याची माहीती असून अद्याप बेपत्ता युवकाचा शोध लागलेला नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaipur Accident: भीषण अपघात! डंपरची ४० वाहनांना धडक; ५० जणांना चिरडलं, ११ लोकांचा जागीच मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Nashik Cctv Network : सिंहस्थ अवघ्या दीड वर्षांवर; पण नाशिकचा 'तिसरा डोळा' बंदच! १० वर्षांनंतरही सीसीटीव्हीचे जाळे अपूर्ण

Latest Marathi News Live Update : कोंढवा हत्या प्रकरणातील आरोपी सराईत गुन्हेगार; मुख्य आरोपीवर सात गुन्ह्यांची नोंद

Mumbai News: रिक्षाचालकांची दादागिरी! नियमापेक्षा जादा भाडे आकारतात; प्रवाशांच्या खिशाला कात्री 

Crime: तुझ्याशी बोलायचंय, काम झाल्यावर भेट...; विवाहित प्रियकरानं महिलेला बोलवलं, भयंकर कट रचून संपवलं, कारण काय?

SCROLL FOR NEXT