नाशिक : कौन्सिल ऑफ आर्किटेक्ट यांच्यातर्फे देशभरात नॅशनल अ़़ॅप्टीट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (नाटा) 2020 चे आयोजन केले होते. याअंतर्गत पहिली परीक्षा 19 एप्रिलला होणार होती. मात्र देशात असलेल्या लॉकडाऊनमुळे ही परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता लॉकडाऊन संपल्यानंतरच परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक जाहिर केले जाणार असल्याचे कौन्सिल ऑफ आर्किटेक्टतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
केंद्र शासनातर्फे प्राप्त निर्देशांनंतर हा निर्णय
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सावधगिरी म्हणून यापूर्वी सनदी लेखापाल (सीए) परीक्षादेखील मे ऐवजी जून महिन्यात घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यानंतर आता आर्किटेक्टचर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नाटा परीक्षा स्थगित करत पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. केंद्र शासनातर्फे प्राप्त निर्देशांनंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे स्पष्ट करण्यात आल्या आहेत. शैक्षणिक वर्ष 2020-21 च्या प्रवेशासाठी पहिली नाटा 2020 परीक्षा 19 एप्रिलला नियोजित होती. मात्र आता ही परीक्षा स्थगित केली असून, सुधारीत वेळापत्रक संकेतस्थळावर जाहिर केले जाणार असल्याचे कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर यांच्यातर्फे स्पष्ट केले आहे. देशात लॉकडाऊन संपल्यानंतरच यासंदर्भातील वेळापत्रक जाहीर केले जाईल, असेही नमुद केले आहे.
कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरतर्फे आणखी काही महत्त्वाचे निर्णय
'नाटा 2020'च्या नोंदणीसाठी पुन्हा एकदा संधी उपलब्ध परीक्षा पुढे ढकलण्यासह अन्य काही महत्त्वाचे निर्णय कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरतर्फे घेतले आहे. याअंतर्गत पहिल्या नाटा 2020 या परीक्षेसाठी नोंदणी करण्याची मुदतदेखील वाढवून दिलेली आहे. त्यानुसार इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांना आता संकेतस्थळावरुन 15 एप्रिलपर्यंत नावनोंदणी करता येणार आहे. छायाचित्र अपलोड करण्यासह शुल्क भरण्याची मुदत 19 एप्रिलपर्यंत असणार आहे. दाखल केलेल्या अर्जात दुरूस्तीची मुदत 20 ते 22 एप्रिलपर्यंत असणार आहे.
हेही वाचा > रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या 'त्या' अनोळखी तरुणाच्या मदतीला देवदूतासारखा धावून आला!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.