palkhi2.jpg
palkhi2.jpg 
नाशिक

यंदा नाथांची आषाढी वारी वारकऱ्यांविनाच...सविस्तर वाचा

सकाळवृत्तसेवा

नाशिक : राज्यातील मानाच्या प्रमुख आठ पालख्यांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्‍वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांची यंदाची आषाढी वारी वारकऱ्यांऐवजी फक्त नाथांच्या पादुकाच करणार आहेत. पुण्यातील प्रमुख दिंड्यांच्या सोबत नाथांची दिंडी शासनाच्या निर्णयानुसार काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात वारकऱ्यांऐवजी पादुकांची वारी होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने त्र्यंबकेश्‍वरहून दशमीला वाहनातून नाथांची वारी पंढरपूरला निघेल हे स्पष्ट झाले. 

बैठकीत एकमताने शिक्कामोर्तब

यंदा लॉकडाउनच्या काळात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणारी आषाढी वारी प्रभावित झाली आहे. दरम्यान, राज्यातील मानाच्या आठ आणि इतर 156 याप्रमाणे दिंड्यांपैकी किती दिंड्यांना परवानगी द्यायची हा विषय महिन्यापासून चर्चेत होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. 29) पुण्यात तेथील प्रमुख दिंड्यांच्या मानकऱ्यांची बैठक झाली. यापूर्वीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे मानाच्या प्रमुख पालख्यांत पादुका पंढरपूरला नेण्यावर एकमत झाले होते. या बैठकीत तोच निर्णय कायम ठेवला गेला. त्यामुळे त्र्यंबकेश्‍वरच्या नाथांची पालखी वाहनातून जाणार यावर शिक्कामोर्तब झाले. 

पादुकांची वारी वाहनातूनच 

सासवड येथील सोपानकाकांच्या पालखीच्या मानकऱ्यांनी त्र्यंबकेश्‍वर नाथांच्या वारीबाबत बाजू मांडली. त्यात, पाच मानकरी, विश्‍वस्त आणि वारकरी असे साधारण 20 जण नाथांच्या पादुका घेऊन दशमीला विशेष गाडीतून सोशल डिस्टन्सिंग पाळून पंढरपूरला पोचतील. तेथील नगरपरिक्रमेसह पूजाविधीनंतर दुसऱ्या दिवशी पादुका घेऊन परत येतील, असा साधारण कार्यक्रम ठरला आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत याविषयी पुढील बैठक होईल, असे आम्हाला सांगण्यात आले. त्यानुसार बैठक होऊन पुढील निर्णय होईल, असे देवस्थानचे अध्यक्ष पवन भुतडा यांनी "सकाळ'ला सांगितले. 

परंपरा कायम 

पालखीप्रमुख पुंडलिकराव थेटे, विश्‍वस्त ललिता शिंदे यांनी, नाथांच्या पावणेदोनशे वर्षांच्या वारीची परंपरा कायम राहिली. लॉकडाउनच्या काळातही वारीला खंड पडला नाही याचे समाधान असल्याचे सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT