National Conference at Open University today on National Education Policy nashik news esakal
नाशिक

YCMOU News : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आज मुक्त विद्यापीठात राष्ट्रीय परिषद

केंद्र व शिक्षणशास्त्र विद्याशाखा आणि इंडियन असोसिएशन ऑफ टीचर एज्युकेटर्स (आयएटीई) यांच्यातर्फे शनिवारी (ता. १०) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर परिषदेचे आयोजन केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

YCMOU News : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रा. राम ताकवले संशोधन केंद्र व शिक्षणशास्त्र विद्याशाखा आणि इंडियन असोसिएशन ऑफ टीचर एज्युकेटर्स (आयएटीई) यांच्यातर्फे शनिवारी (ता. १०) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर परिषदेचे आयोजन केले आहे.

सकाळी साडेदहाला परिषदेचे उद्‌घाटन होणार असून, सहभागींना सायंकाळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करणार आहेत. (National Conference at Open University today on National Education Policy nashik news)

मुक्‍त विद्यापीठ प्रांगणात ५६ वी राष्ट्रीय परिषद होत असून, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील महत्त्वपूर्ण संकल्पना ‘भारतीय ज्ञान प्रणाली : शिक्षक, अध्यापन आणि अध्ययन’ असा परिषदेचा विषय आहे. मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे अध्यक्षस्थानी असतील. तसेच, नवी दिल्‍लीतील ‘आयएटीई’चे अध्यक्ष प्रा. मोहम्मद मियान यांची उपस्‍थिती असेल.

उद्‌घाटन कार्यक्रमात नवी दिल्‍लीतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अॅण्ड अॅडमिनिस्ट्रेशनच्‍या कुलगुरू प्रा. शशिकला वंजारी प्रमुख वक्त्या असतील. मुक्त विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, स्कूल ऑफ ऑनलाइन लर्निंग आणि प्रा. राम ताकवले रिसर्च सेंटरच्‍या संचालिका कविता साळुंके, ‘आयएटीई’चे सरचिटणीस प्रा. बी. आर. कुक्रेती, मुक्‍त विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड, शिक्षणशास्‍त्र विद्याशाखेच्या संचालिका डॉ. संजीवनी महाले उपस्थित असतील.

सोमवारी (ता. १२) परिषदेच्या समारोप कार्यक्रमास शिक्षण आयुक्‍त सूरज मांढरे यांची प्रमुख उपस्‍थिती असेल. तसेच, नागपूर येथील बी.एड. महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. के. एम. भांडारकर उपस्‍थित राहातील. या परिषदेत भारतातील नामांकित मान्यवरांची व्याख्याने, पेपर सादरीकरण, परिसंवादाचे आयोजन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT