nisarg cyclone.png 
नाशिक

जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे अनेकांचे होत्याचे नव्हते!...वाचा सविस्तर

सकाळवृत्तसेवा

नाशिक : निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, इतक्या हेक्‍टरवरील पिके आडवी झाली आहेत. त्यात कांदा, टोमॅटो, ऊस, डाळिंबासह भाजीपाल्याला सर्वाधिक तडाखा बसला. वीज पडून व वादळामुळे लहान- मोठी तब्बल इतकी जनावरे दगावली. पाचशेहून अधिक कच्च्या व पक्‍क्‍या घरांची पडझड झालीय. 

वादळात अनेकांचे होत्याचे नव्हते

बुधवारी चक्रीवादळाने जिल्ह्यात मोठा पाऊस झाला अन् वादळात अनेकांचे होत्याचे नव्हते झाले. प्रशासनाने तालुकानिहाय पंचनामे केले आहेत. वादळी वाऱ्यामुळे शेतपीक व शेतातून काढलेल्या मालाचे नुकसान झाले. जिल्ह्यात 239.77 हेक्‍टरवरील पिके आडवी झाली आहेत. सर्वाधिक नुकसान सिन्नर व दिंडोरी तालुक्‍यांत झाले. कांदा, डाळिंब, ऊस, टोमॅटो व भाजीपाल्याचे अधिक नुकसान झाले. पोल्ट्री फार्म, पॉलिहाउस व कांदाचाळी जमीनदोस्त झाल्या. तसेच गाई, म्हशी, बोकड, शेळ्या व मेंढ्या दगवण्याचे प्रमाणही जास्त आहे. जिल्ह्यात 73 जनावरे दगावली आहेत. यात बागलाण तालुक्‍यात सर्वाधिक पशुधनाचे नुकसान झाले आहे. 

घरांची मोठ्या प्रमाणात पडझड

जोरदार वारा व मुसळधार पाऊस यामुळे घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. यात कच्च्या घरांससह पक्‍क्‍या घरांचेही नुकसान झाले आहे. याशिवाय वादळाच्या तडाख्याने झोपड्यांचे मोठे नुकसान झाले. घरांचे छत व पत्रे उडणे, भिंत खचणे अशा स्वरुपाचे नुकसान झाले. यात 36 पक्‍क्‍या घरांसह 475 कच्च्या घरांचे मोठे नुकसान झाले. 

नुकसान आकडेवारी

पिके - 239.77 हेक्‍टर 
लहान जनावरे - 28 
मोठी जनावरे - 45 
कच्ची घरे - 475 
पक्की घरे - 36 
पॉलिहाउस - 10 
शेडनेट - 11 
पोल्ट्री - 06 
कांदाचाळी - 07 
गोठे - 02  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price Hike: इंधनाचे दर पुन्हा वाढले! सोमवारी मध्यरात्रीपासून भाववाढीचा निर्णय, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

Kalamboli Accident: नवी मुंबईत भरधाव कारचा थरार! डॉक्टरनं पदपथावरील पादचाऱ्यांना चिरडलं; लहान मुलांसह ४ जण गंभीर जखमी

Rahul Gandhi Defamation Case: पुण्यात राहुल गांधी मानहानी खटल्याला कडक कायदेशीर वळण! विशेष कोर्टातील उलटतपासात सात्यकी सावरकरांनी मान्य केला '१० दया याचिकां'चा ऐतिहासिक ताळेबंद

Kannad Accident : मद्यधुंद क्रूझर चालकाने बुलेटला चिरडले; अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी

Pune Developer Death: बांधकाम व्यावसायिक कपिल गांधी यांचे हृदयविकाराने निधन

SCROLL FOR NEXT