Naturopathy esakal
नाशिक

निसर्गोपचाराने कोरोनावर यशस्वी मात; एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश

एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश; ऑक्सिजनचे वाढते प्रमाण

महेंद्र महाजन

नाशिक : निसर्गोपचाराने (Naturopathy) कोरोनावर (corona) यशस्वी मात करता येते, याची अनुभूती एकाच कुटुंबातील (family) चौघांनी घेतल्याची माहिती डॉ. अमित शिंपी यांनी दिली. तसेच निसर्गोपचारामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण वाढत असल्याचे उपचाराअंती आढळून आले आहे. वाचा सविस्तर..

एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश; ऑक्सिजनचे वाढते प्रमाण

नाशिक रोड भागातील अहिरे कुटुंबातील सदस्याला १५ एप्रिलला कोरोनाची बाधा झाली. त्यांच्यावर औषधोपचार सुरू झाले. दोन दिवसांनंतर त्यांची आई, पत्नी, मुलगा आणि भावजय पॉझिटिव्ह आल्या. भयभीत झालेल्या परिवारातील आईला रुग्णालयात दाखल केले. त्यांचे २७ एप्रिलला निधन झाले. सुरवातीला पॉझिटिव्ह आढळलेल्या सदस्यांचा सीटी स्कॅन स्कोअर सात झाला आणि ऑक्सिजनची पातळी ७० पर्यंत पोचली. या कुटुंबाने ओळखीतून डॉ. शिंपी यांचा परिचय करून घेतला. त्यानंतर २० एप्रिलपासून त्यांच्याकडे कुटुंबातील सर्वांनी निसर्गोपचार घेण्यास सुरवात केली. पहिल्या दिवसापासून फळांचा रस, नारळपाणी, आहार-व्यायाम आणि ॲक्युप्रेशर थेरपी सुरू केल्यावर तिसऱ्या दिवशी घरातील सर्व सदस्य ठणठणीत झाले. सर्वांची ऑक्सिजन पातळी ९७, ९८ अशी आहे. जेल रोड भागातील रहिवासी जाधव कुटुंबातील चौघांना कोरोनाची बाधा झाली. गृहिणीचा सीटी स्कॅन स्कोअर सहा, पतीचा चार होता. ऑक्सिजन कमी झाल्याने महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा होईना म्हणून खासगी रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी सीटी स्कॅन केल्यावर पतीचा स्कोअर दहा, पत्नीचा आठ झाला. दांपत्यावर उपचार केल्यावर चार दिवसांनंतर त्यांना घरी सोडले. घरी आल्यावर पतीची ऑक्सिजनची पातळी कमी होत गेल्याने घरच्यांची धास्ती वाढली. पुन्हा त्यांना खासगी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तब्येत चांगली आहे म्हणून घरी पाठविले.

रुग्णाचे मनोबल वाढविण्याचा इलाज

दोन दिवसांनंतर त्यांची ऑक्सिजन लेव्हल ७० पर्यंत कमी झाली. पतीवर हृदयविकाराचे इलाज शहरातील खासगी रुग्णालयात सुरू आहेत. इथल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सीटी स्कॅन केल्यावर स्कोअर २५ आला होता. मग व्हेंटिलेटरच्या खाटेचा शोध सुरू झाला. एका खासगी रुग्णालयाने त्यांना घरी पाठविले. कुटुंबाने डॉ. शिंपी यांच्याकडे निसर्गोपचार घेण्याचे ठरविले. आहार-व्यायाम आणि विशिष्ट ॲक्युप्रेशर उपचार आणि रुग्णाचे मनोबल वाढविण्याचा इलाज करण्यात आला. काही काढे आणि घरगुती तयार केलेले औषध देण्यात आले. तीन दिवसांनंतर त्यांचे ऑक्सिजनचे प्रमाण ९१ झाले. कफ बाहेर पडत गेला, श्‍वास मोकळा झाला. पाच दिवसांनंतर ऑक्सिजन ९७ पर्यंत पोचला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amba Ghat Accident : आंबा घाटात भीषण अपघात; परराज्यातील बस ७० फूट दरीत कोसळली

Marathi Breaking News LIVE: नाशिकमध्ये बनावट शालार्थ आयडी प्रकरणी उपसंचालकावर पोलिस कोठडी; फरार आरोपी अजूनही शोधात

Courtroom Drama: सुनावणी सुरू झाली अन् वकील तोंडावर टेप लावून आले; न्यायालयात घडला विश्वासघाताचा प्रसंग, न्यायाधीशही संतापले

Shukra Guru Pratiyuti Yog 2026: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात तयार होतोय शक्तिशाली राजयोग, 'या' राशींना होईल आर्थिक लाभ

माेठी बातमी ! ‘सुरत-चेन्नई’तील २२२ किमी मार्ग बीओटीवर होणार; भारतमाला योजनेची मुदत संपल्याने निर्णय..

SCROLL FOR NEXT