wani meeting.jpg 
नाशिक

सप्तशृंगी गडावरील यंदाची शारदीय नवरात्रोत्सव यात्रा रद्द; इतिहासात पहिल्यांदाच परंपरा खंडित

दिगंबर पाटोळे

नाशिक / वणी :  साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ असलेल्या सप्तशृंगी गडावरील आदिमाया सप्तशृंगी गडावरील १७ ऑक्टोबर पासून सुरु होणारा शारदीय नवरात्रोत्सव यात्रा रद्द करण्यात आला आहे. नवरात्रोत्सव व कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर यात्रा कमीटीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी आज सप्तशृंगीगडावर प्रशासनाच्या सर्व विभाग प्रमुखांच्या बैठकीत केली आहे.

नवरात्रोत्सव व कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारींची माहिती

सप्तशृंगी गडावर कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने गेल्या सात महिन्यांपासून धार्मिक, प्रार्थना स्थळे बंद ठेवली आहे. त्यामूळे सप्तशृंगी गडावर एप्रिल महिन्यातील चैत्रोत्सव पाठोपाठ १७ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर दरम्यान संपन्न होणारा शारदीय नवरोत्सव व ३० ऑक्टोबर रोजी संपन्न होणारी कावड यात्रा व कोजागिरी पौर्णिमा उत्सवही रद्द करण्यात आली आहे.  नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभुमीवर गुरुवारी, (ता. ८) सप्तशृंगी गडावर श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या रोपवे येथील कार्यालयात जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या प्रशासनाच्या सर्व विभागप्रमुखांच्या बैठकीत नवरोत्रोत्सव व कोजागिरी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आदिमायेच चैत्रोत्सव यात्रेपाठोपाठ नवरात्रोत्सवही कोविड -१९ च्या धर्तीवर इतिहासात पहिल्यांदा बंद करण्यात आल्याने आदिमायेच्या भाविक भक्तांचा देवी दर्शनाच्या आनंदावर विरजन पडले आहे.

राज्यासह देशभरातून भाविकांचा मेळा

दरवर्षी नवरात्रोत्सवात सुमारे चार ते पाच लाख भाविक पदयात्रेने तसेच कावड यात्रेसाठीही एक ते दीड लाख कावडीधारक राज्यासह, मध्यप्रदेश, गुजरात राज्यातून विविध ठिकाणाहून वेगवेगळ्या नद्यांचे पवित्र जल कावडीद्वारे शेकडो-हजारो किलोमीटरचा अनवानी पदयात्रेने प्रवास करुन येतात. व कोजागिरीच्या दिवशी आदिमायेचा कावडीने आणलेल्या जलाचा महाअभिषेक घालतात. तसेच कावडीधारकांबरोबर दोन लाखांवर पदयात्रेकरु कावडीधारकांसोबतच कोजागिरी पौर्णिमा, कावडयात्रेसाठी सहभागी होत असतात. तसेच कोजागिरी पौर्णिमेस तृतीयपंथीयांची छबिना उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरा होत असल्याने या दिवशी राज्यासह देशभरातून तृतीयपंथीयांचे गुरुंसह तीन ते चार हजार तृतीयपंथी गडावर येवून छबिना मिरवणूक काढतात. या  नवरात्र व कोजिगीरी पौर्णिमा उत्साहात पंधरा ते वीस लाखांवर भाविक दरवर्षी गडावर हजेरी लावून आदिमायेचरणी नतमस्तक होतात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव व कावडयात्रोत्सव रद्द केल्याने भाविक व कावडीधारकांची वर्षानूवर्षांची गडावरील पालखी, कावड, पायीवरीची परंपरा खंडीत झाल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

रस्ते सील करण्याबाबत प्रशासनास सुचना

दरम्यान नवरात्रोत्सव काळातील नियमित धार्मिक विधी, होमहवन पुजा, कीर्तीध्वज पुजन व ध्वजारोहन, दसरा उत्सव आदी कार्यक्रम कोविड संदर्भातील अत्यावश्यक नियमावली पाळून व नेमूण दिलेल्या पुरोहितांच्या उपस्थित  संपन्न होणार आहे. तसेच पदयात्रोकर व कावडीधारक गडावर येवू नये यासाठी प्रशासनाच्यावतीने तालुकासीमा व गडावरील येणारे रस्ते सील करण्याबाबत प्रशासनास सुचना देण्यात आल्या आहे. तसेच नवरात्रोत्सव व कावड यात्रेसाठी सप्तशृंगी गडावर न येता आपल्या घरीच आदिमायेची घटस्थापना व पुजा विधी करुन दर्शन घेवून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

संपादन - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याचे भाव कोसळले! सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण; तुमच्या शहरात आता किती भाव?

Jan Shatabdi: जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड, 3 तासांपासून एकाच ठिकाणी ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

Karad Encroachment : कऱ्हाडच्या वारुंजी फाट्यावर पहाटे अतिक्रमणावर हातोडा; महामार्गालगतची सहा व्यावसायिक खोकी जेसीबीने जमीनदोस्त

Marathi News Live Updates: ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून आमदाराचा महापालिका आयुक्तांना धमकीचा आरोप; ठेकेदाराच्या पात्रतेवरून नेमका काय घडला वाद?

Divya Mittal IAS Resignation : आयएएस पदाचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT