bjp tushar bhosale apologize for criticism of sharad pawar ncp ambadas khaire warns esakal
नाशिक

तुषार भोसलेंनी माफी न मागितल्यास शहरात फिरू देणार नाही : खैरे

महेंद्र महाजन

नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. त्याबद्दल तातडीने जाहीर मागावी, अन्यथा श्री. भोसले यांना शहरात फिरू न देण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी दिला आहे.

खैरे म्हणाले, पवारांवर टीका म्हणजे....

सोशल मीडियातून श्री. भोसले यांनी हीन दर्जाची टीका केली आहे. ही टीका म्हणजे, सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरण हाताळत असलेले अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोमधील अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधातील पुरावे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमासमोर आणल्यानंतर भाजपची आगपाखड होण्याचे कारण नाही. तरीही विरोधाला विरोध केला जात आहे. पक्षप्रेम सिद्ध करून आपली वफादारी दाखविण्यासाठी श्री. भोसले यांनी केलेल्या टीकेमुळे सामाजिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करत पदाधिकारी- कार्यकर्ते समज देण्यासाठी श्री. भोसले यांना भेटण्यासाठी गेले होते. पण श्री. भोसले हे घर सोडून गेले असल्याचे निदर्शनास आले. म्हणून श्री. भोसले यांनी आहे त्या ठिकाणावरून माफी मागावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT