ncp protest against increase in onion export duty today nashik news Sakal
नाशिक

Onion Export Duty : कांदा निर्यात शुल्कवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी पक्षातर्फे आज रास्ता रोको

सकाळ वृत्तसेवा

Onion Export Duty : नाफेडमार्फत कांदा खरेदी करण्याच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले असले तरी निर्यातशुल्कवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट व बहुजन शेतकरी संघटनेच्या वतीने नाशिक-पुणे रोडवरील शिंदे गावानजीकच्या टोल नाक्याजवळ बुधवारी (ता. २३) सकाळी दहाला रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. (ncp protest against increase in onion export duty today nashik news)

शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड व बहुजन शेतकरी संघटनेचे नेते अशोक खालकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत आंदोलनाची माहिती दिली. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी देशोधडीला लागणार आहेत.

देशात पन्नास लाख टन कांद्याचे उत्पादन झाले असताना दोन लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे ४८ टन कांद्याचे करायचे काय? त्यामुळे सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ आंदोलन केले जाणार आहे.

शासनाने कांदा निर्यातशुल्कवाढ रद्द करावी, टोमॅटोची आयात थांबवावी, शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे, दुबार पेरणीच्या संकटामुळे त्वरित दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून केली जाणार असल्याची माहिती आव्हाड यांनी सांगितली. शहराध्यक्ष गजानन शेलार, गोकुळ पिंगळे, रतन चावला, बहुजन शेतकरी संघटनेचे रमेश आवटे आदी या वेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Code of Conduct: 'आमदार आले की उभं राहा'! महाराष्ट्र सरकारचा अधिकाऱ्यांना अजब आदेश; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : मुंब्रा रेल्वे अपघात, अटक टाळण्यासाठी अभियंत्यांची हायकोर्टात धाव

Sharad Pawar: राज ठाकरेंसाठी शरद पवार आग्रही; काँगेसलाही दिला मेसेज, उद्धव ठाकरेंची भूमिका काय?

Pay and Park Issue : इस्कॉन मंदिराजवळील ‘पे अँड पार्क’मध्ये वाहनचालकांची लूट; महापालिकेच्या भक्तिवेदांत पार्किंगमधील प्रकार

Horoscope Prediction 2025: उद्या तयार होतोय केंद्र त्रिकोण योग, शनिदेवाच्या आशीर्वादाने मेष अन् मिथुनसह 'या' 5 राशींचे उजळेल भाग्य

SCROLL FOR NEXT