Jayant Patil Ajit Pawar
Jayant Patil Ajit Pawar esakal
नाशिक

NCP News : बाजार समित्यांसाठी राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी सुरू; बडे नेते येणार नाशिक दौऱ्यावर!

सकाळ वृत्तसेवा

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांची निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून सोमवारपासून (ता.२७) अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली आहे. बाजार समित्यावरील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

त्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या आठवड्यात जिल्हा दौऱ्यावर येत आहे. यात, बैठका घेऊन बाजार समित्यांची रणनीती ठरली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (NCPs march for market committee eleciton begins Big leaders ajit pawar jayant patil will visit Nashik NCP News)

जिल्ह्यातील १४ बाजार समितीच्या निवडणुकांसाठी दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया राबविली जात आहे. पहिल्या टप्प्यात २८ एप्रिलला नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, नाशिक, घोटी, येवला, मालेगाव, चांदवड, देवळा, कळवण, सुरगाणा, दिंडोरी, सिन्नर, नांदगाव या बाजार समित्यांसाठी मतदान होईल.

दुसऱ्या टप्प्यात लासलगाव, मनमाड बाजार समितीसाठी ३० एप्रिलला मतदान होणार आहे. यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या नाशिक बाजार समितीत माजी खासदार देवीदास पिंगळे तर, पिंपळगाव बसवंतमध्ये आमदार दिलीप बनकर यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे.

सिन्नर बाजार समितीतही आमदार अॅड. माणिकराव कोकाटे, दिंडोरी बाजार समिती श्रीराम शेटे, दत्तात्रय पाटील, कळवण बाजार समिती धनंजय पवार, आमदार नितीन पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे.

माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील येवला बाजार समितीही राष्ट्रवादीकडे आहे. घोटी बाजार समितीत गोरख बोडके, अॅड. संदीप गुळवे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीची सत्ता आहे.

गतवेळी राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता होती. यातही राष्ट्रवादीने ताकद लावत, बाजार समित्या ताब्यात ठेवल्या होत्या. मात्र, २०१९ विधानसभा निवडणुकीनंतर, राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहे. अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार होते.

विरोधी पक्षनेते अजित पवार गुरुवारी (ता.३०) नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत असून, सिन्नरमध्ये त्यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा होत आहे. याशिवाय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहे.

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. याशिवाय या दौऱ्यात, काही प्रमुख गाठीभेटी होऊ शकतात. बाजार समितीच्या निवडणुकीची चर्चा होऊन, मोर्चेबांधणी या दौऱ्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दौऱ्याकडे राष्ट्रवादीचे लक्ष लागले आहे.

असे बदल, अशी ही नवी जुळवणी

राज्यात सत्तांतर होऊन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना व भाजपचे सरकार सत्तेवर आले आहे. या बदलत्या राजकीय समीकरणांचे पडसाद नाशिक जिल्ह्याच्या राजकारणावर देखील उमटले आहेत.

पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे शिंदे गटात सहभागी झालेले आहे. बाजार समितीच्या रिंगणात उतरण्याची शिंदे गटाने जोरदार तयारी केली आहे. नाशिक बाजार समितीत तर, खासदार गोडसे व भाजप पॅनल उतरविण्याची तर घोषणाच केली आहे.

पिंपळगाव बसवंत बाजार समितीतही आमदार बनकर यांच्यापुढे माजी आमदार अनिल कदम, गोकुळ गीते यांनी आवाहन देण्याच्या तयारीत आहे. कळवण बाजार समितीतही जिल्हा परिषदेचे माजी सभापती रवींद्र देवरे यांनी पॅनल उतरविण्याची घोषणा केली आहे.

लासलगाव बाजार समितीतही जयदत्त होळकर, नानासाहेब पाटील यांना शह देण्याची माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, डी. के. जगताप यांनी पॅनल करण्याची तयारी केलेली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Result : बारावीचा निकाल २.१२ टक्क्यांनी वाढला; कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.५१

Narendra Modi : ... तर नेहरूंनी आरक्षणच दिले नसते

Pune News : विशाल अग्रवालसह चार जणांना अटक

Azamgarh Loksabha Election : ‘सप’च्या बालेकिल्ल्यात दोन यादवांमध्ये लढाई; धर्मेंद्र यादव विरुद्ध दिनेशलाल निरहुआ

Milind Deora : उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस पक्ष सोडला

SCROLL FOR NEXT