NDCC Bank Nashik
NDCC Bank Nashik esakal
नाशिक

NDCC Bank Nashik: जिल्हा बॅंक वाचविण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या घराबाहेर आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वाचविण्यासाठी जिल्हा शेतकरी समन्वय समितीने मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. बॅंक वाचविण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने जिल्हा बँकेच्या भागभांडवलामध्ये ७५० कोटी रुपयांची गुंतवणुक करून जिल्हा बँक सुरळीत करावी.

तसेच यासाठी देशाचे सहकार मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे सहकार मंत्री यांच्याकडे पाठ पुरावा करण्यासाठी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार, खासदार यांच्याकडे माध्यमातून पत्र व्यवहार करून त्यांचे घराचे बाहेर आंदोलन करण्याचे निर्णय समितीच्या बैठकीत झाला.

जिल्हा बँक अडचणीत आल्यामुळे सरसकट शेतकरी थकीत कर्जदारावर जप्ती कारवाई सुरू केली या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता.१०) शेतकरी संघटनांची व शेतकऱ्यांची बैठक हुतात्मा स्मारकात झाली. बैठकीत सरसकट जप्ती कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात आला.

बँकेने पहिल्या शंभर थकीत कर्जदार यांच्यावरती कठोर कारवाई करून वसुली करावी. तसेच जिल्हा बँकेला अडचणी असणाऱ्यास आजी- माजी बँकेच्या संचालकांवर कठोर कारवाईसाठी बँकेने पाठपुरावा करावा, तसेच जे प्रामाणिक व शेतीवरच अवलंबून असणाऱ्या थकीत कर्जबाजारी शेतकऱ्यांकडील वसुली कारवाई त्वरित थांबवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

शेतकऱ्यांची शासनाने जबाबदारी घेऊन जिल्हा बँकेला ७५० कोटींचे विशेष पॅकेज मिळवून द्यावे. यासाठी येणाऱ्या काळात जिल्हा समन्वय समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असेही बैठकीत निश्चित झाले. बैठकीनंतर, प्रशासक अरुण कदम यांची भेट घेऊन त्यांना निवेदनही देण्यात आले.

याप्रसंगी प्रशासक कदम यांनी समितीची भूमिका समजून घेतली व जे शेतकरी फक्त शेतीवर अवलंबून आहे, त्यांचे इतर कुठलेही उत्पन्नाचे साधन नाही, स्रोत नाही.

अशा शेतकऱ्यांना जप्तीच्या कारवाई संदर्भात दिलासा देण्याचे आश्वासन कदम यांनी यावेळी दिले. जिल्हा बँक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा: या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

''जिल्हा बँकेची वसुलीसाठी प्रशासक कदम यांचे प्रमाणिक प्रयत्न सुरू आहे. बड्या थकबाकीदारांकडून वसुलीसाठी बॅंकेने कडक पावली उचलावीत.

लहान शेतकऱ्यांना वसुलीसाठी त्रास देऊ नये. बॅंकेतील काही कर्मचारी प्रशासक कदम यांना त्रास देण्याच्या हेतून तक्रारी करत आहे. मात्र, शेतकरी तसेच जिल्हा शेतकरी समन्वय समिती त्यांच्या पाठीशी उभी आहे.'' - राजू देसले, समन्वयक, जिल्हा बॅक वाचव, सहकार वाचव

या प्रसंगी व्यवस्थापक शैलेश पिंगळे, शेतकरी समन्वय समितीचे साहेबराव काका मोरे, राजू देसले, सुधाकर मोगल, दत्तुभाऊ बोडके, नाना बच्छाव, वैभव देशमुख, सचिन कड, राम निकम, सोमनाथ नागरे, संदीप मोरे, संजय पाटोळे, मनोहर देवरे प्रभाकर वायचले, पुंजाराम कडलग, समाधान बागल, श्याम गोसावी आदी शेतकरी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर प्रकरणातील अटकेतील डॉक्टरांच्या अडचणी वाढणार? पोलिसांकडून डॉ. तावरेसह हाळनोरच्या निलंबनाचा प्रस्ताव

Rishabh Pant: 'एअरपोर्टवरही जात नव्हतो, कारण...' टी20 वर्ल्ड कप खेळण्यापूर्वी पंतने सांगितला अपघातानंतरचा अनुभव

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर अपघातातील आरोपीला मद्य देणाऱ्या कोझी व ब्लॅकच्या मालकांसह इतरांचे जामिनासाठी अर्ज; उद्या सुनावणी

Fact Check: कंगणा राणौतचा अबू सालेमसोबत फोटो व्हायरल झाल्याचा 'तो' दावा खोटा

Pune Porsche Car Accident: बालसुधारगृहात असलेल्या अल्पवयीन आरोपीचा 'असा' आहे दिनक्रम; पहाटे उठून करावी लागते प्रार्थना अन्...

SCROLL FOR NEXT