ndcc-bank-nashik esakal
नाशिक

Nashik News: जिल्हा बॅंकेने मागविली थकबाकीदारांची माहिती

मुद्दलसह व्याजाची माहितीबाबत सोसायट्यांना पत्र

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतर्फे सुरू असलेल्या लिलाव, जप्ती प्रक्रियेविरोधात पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर जिल्हा बँक शेतकरी बचाव कृती समितीने केलेल्या बि-हाड आंदोलनाची दखल घेत बॅंकेने विविध कार्यकारी सोसायट्यांकडून थकबाकीदार सभासदावर ६ टक्के, ७ टक्के व ८ टक्के दराने होणारे सरळव्याजाची आकारणी करून तशी माहिती मागविली आहे. दोन दिवसात ही माहिती सादर करण्याचे आदेश बॅंकेने दिले आहेत. (NDCC Bank seeks information of defaulters Letter to society regarding principal and interest information Nashik News)

जिल्हा बँकेने ६२ हजार थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनीची लिलाव प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्याविरोधात जिल्हा बँक शेतकरी बचाव कृती समितीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता.१६) सर्वपक्षीय बिऱ्हाड आंदोलन केले.

तत्पूर्वी पालकमंत्री भुसे, माजी खासदार शेट्टी यांच्या उपस्थितीत पालकमंत्री यांच्या नाशिक येथील संपर्क कार्यालयात थकबाकीदार सभासदांची बैठक झाली. बैठकीमध्ये थकबाकीदार सभासदांच्या कर्ज वसुलीसाठी व्याजाच्या संदर्भात चर्चा झाली.

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

थकबाकीदारांना संस्था / बँक आकारणी करीत असलेला व्याजदर मान्य नसल्याने चर्चेदरम्यान थकबाकीदार सभासदांचे थकीत बाकीवर ६ टक्के, ७ टक्के व ८ टक्के दहेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणूनरम्यान व्याज सवलत मिळणेची मागणी केली. या अनुषंगाने पालकमंत्री भुसे यांनी थकबाकीदार सभासदावर तशी आकारणी करुन माहिती मागविली आहे.

त्यानुसार जिल्हा बॅंकेचे मुख्यकार्यकारी अधिकारींनी जिल्हाभरातील सर्व विविध कार्यकारी सोसायटी संस्थांना पत्र देत त्याबाबतची माहिती सादर करण्याचे आदेश काढले आहेत. ही माहिती एकत्रित करून राज्य शासनाला सादर केली जाणार आहे. त्यावर, राज्य शासनाकडून काय निर्णय होतो याकडे आता थकबाकीदार सभासदांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: आनंदाची बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे दहा पदरी होणार; चार नव्या लेनसाठी राज्य सरकारचं नियोजन काय?

Stock Market Closing : बाजारातील तेजी सलग सहाव्या दिवशीही कायम; निफ्टीने ओलांडला 26000 चा टप्पा; कोणते शेअर्स फायद्यात?

Viral Video: शिल्पा शेट्टीची 'बिबट्या साडी' पाहिलीत का? लाल साडीत हॉट अंदाज, अन् पदरावर भला मोठा बिबट्या

Latest Marathi Breaking News:अमित ठाकरे यांची त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर पहिली प्रतिक्रिया

Mumbai News: जिथं भविष्याची स्वप्नं पाहिली त्याच शाळेने माझ्या मुलीचा जीव घेतला, चिमुकलीच्या आईचा मन हेलावणारा टाहो!

SCROLL FOR NEXT