new 943 corona patients found in nashik marathi news
new 943 corona patients found in nashik marathi news 
नाशिक

Corona Update : नाशिक जिल्ह्यात नवे ९४३ कोरोना बाधित, उपचारानंतर ८१८ कोरोनामुक्‍त

अरुण मलाणी

नाशिक : जिल्‍ह्यात दिवसभरात आढळणाऱ्या नवीन कोरोना बाधितांची संख्या सलग पाचव्‍या दिवशी एक हजारांहून कमी राहिली. बुधवारी (ता.७) दिवसभरात ९४३ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तर ८१८ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. तेरा रूग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. यातून ॲक्‍टीव्‍ह रूग्‍ण संख्येत ११२ ने वाढ झाली असून, सद्य स्‍थितीत ९ हजार २८९ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

बुधवारी नव्‍याने आढळलेल्‍या बाधितांमध्ये नाशिक शहरातील ४७८, नाशिक ग्रामीणचे ४३७, मालेगावचे २२ तर जिल्‍हाबाह्य सहा रूग्‍ण आढळून आले. कोरोनामुक्‍त झालेल्‍यांमध्ये नाशिक शहरातील ४१७, नाशिक ग्रामीणचे ३७९, मालेगावचे नऊ तर जिल्‍हाबाह्य तेरा रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दिवसभरातील तेरा मृत्‍यूंमध्ये नाशिक शहरातील पाच, नाशिक ग्रामीणचे चार, मालेगाव महापालिका हद्दीत दोन तर जिल्‍हाबाह्य दोघा रूग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. जिल्‍ह्‍यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ८२ हजार ८३८ वर पोहोचली असून, यापैकी ७२ हजार ०७३ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. १ हजार ४७६ रूग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. 

दरम्‍यान दिवसभरात नाशिक महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ९४०, नाशिक ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात २१९, मालेगाव महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात २२, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात १५, जिल्‍हा रूग्‍णालयात पाच संशयित दाखल झाले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत १ हजार ८३९ अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक ग्रामीणचे १ हजार २६७ अहवालांचा समावेश आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT