New number series for three wheelers esakal
नाशिक

New Number Series : तीनचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तीनचाकी वाहनांसाठी (एमएच- १५- जेए) ही नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे. आकर्षक व पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी गुरुवारी (ता.१३) सकाळी साडेदहाला इच्छुकांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी केले आहे. (New number series for three wheelers launched nashik Latest Marathi News)

नवीन मालिकेच्या राखीव आकर्षक नोंदणी क्रमांकांसाठी शासन नियमानुसार ठराविक शुल्क विहित केले आहे. या अनुषंगाने इच्छुकांनी गुरुवारपर्यंत दिलेल्या वेळेत कार्यालयात अर्ज जमा करणे अनिवार्य असेल. अर्जासोबत पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, वीज बिल, घरपट्टी यापैकी एक तसेच अर्जदाराचे फोटो, आधारकार्ड किंवा निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड यापैकी एक साक्षांकित प्रत तसेच आधारलिंक मोबाईल क्रमांक सादर करणे आवश्यक आहे.

पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी शुल्काची रक्कम कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा किंवा शेड्यूल्ड बँकेचा डिमांड ड्राफ्टद्वारे प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक यांच्या नावे भरणे आवश्यक आहे. अर्जदाराने एकदा राखून ठेवलेला पसंती क्रमांक दुसऱ्या व्यक्ती संस्थेच्या नावे हस्तांतरित होणार नाही.

कोणत्याही परिस्थतीत बदलून किंवा रद्द करता येणार नाही. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास अशा आकर्षक क्रमांकांची यादी कार्यालयातील नोटीस बोर्डावर त्याच दिवशी प्रदर्शित केली जाईल. अधिक माहितीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन श्री.शिंदे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठ्यांनी ठरवायंच, नेत्याला मोठं करायचं की लेकराबाळांना; जरांगे पाटील रडले

Satish Jarkiholi ED Raid : ED च्या धाडीत सापडले 2 कोटी! कारवाईनंतर बांधकाममंत्री म्हणाले, 'आमच्या संस्थांची वार्षिक उलाढाल दोन हजार कोटींची..'

बापरे! अमीषा पटेलच्या आईच्या घरातून डायमंड डायमंडचे दागिने चोरीला; घरातील हाऊस हेल्पला अटक

Marathi News Live Updates : मुंबईत महिलांनी अमृताताई आणि लताताईंच्या घरी जाऊन हळदी कुंकू लावा : जरांगे पाटील

Kolhapur Farmer Loan Waiver Second List : शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर! जिल्ह्यातील 3,833 शेतकऱ्यांना दिलासा; तुमचे नाव आहे का?

SCROLL FOR NEXT