Winter esakal
नाशिक

Nashik News : नववर्षाची सुरवात गारठ्याने!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : २०२२ मध्ये हिवाळ्यात कधी वातावरणात गारठा निर्माण होत असतानाच, मध्येच थंडी गायब झाल्‍याची अनुभूती येत होती. परंतु नवीन वर्षाची सुरवातच गारठ्याने झाली आहे. पहिल्‍याच दिवशी रविवारी (ता. १) नाशिकचे किमान तापमान १० अंश सेल्‍सीयस नोंदविले गेले. तर, कमाल तापमान ३०.७ अंश राहिले. (New Year begins with cold winter weather nashik news)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

उत्तर भारतात झालेल्‍या बर्फवृष्टीमुळे येत्‍या काही दिवसांत पारा आणखी घसरण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. यापूर्वी नोव्‍हेंबरचे काही दिवस व त्‍यानंतर डिसेंबरमध्येही काही दिवस वातावरणात गारठा जाणवत होता. नाताळच्‍या दिवशी २५ डिसेंबरला नाशिकचे किमान तापमान ९.८ अंश सेल्‍सीयसपर्यंत घसरले होते.

त्‍यानंतर मात्र तापमानात वाढ झाल्‍याने किमान तापमान सरासरी ११ ते १२ अंश सेल्सियस राहिले. नवीन वर्षाच्‍या पहिल्‍या दिवशी मात्र तापमान घसरून १० अंश सेल्‍सीयसवर आले. येत्‍या आठवड्याभरात तापमानात आणखी घसरण होण्याची शक्‍यता आहे.

त्‍यामूळे आता पुन्‍हा शेकोट्या पेटणार असून, नाशिककरांना बचावासाठी स्‍वेटर, टोपी, शॉलचा आधार घ्यावा लागणार आहे. सध्या कमाल तापमानात घसरण होत असली, तरी दिवसा उन्‍हाचे वातावरण राहात असल्‍याने कमाल तापमान सरासरी ३० अंश सेल्‍सीयसपर्यंत राहाते आहे. त्‍यामूळे मिश्र वातावरणाचा अनुभव नाशिककर सध्या घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi press conference: राहुल गांधींनी दाखवले पोलिसांच्या क्रूरतेचे धक्कादायक फोटो; अमित शाहांचं नाव घेत केला गंभीर आरोप

Live Marathi News Update : कर्नाटक काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार यांनी कर्नाटक भवन सोडले

Pune Investment Scam: शेअर मार्केट व ऑनलाइन टास्कच्या आमिषाला चौघे बळी; पुण्यात ४६ लाखांची सायबर फसवणूक

Pune Gurupurnima Celebration: पुण्यात गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्सव; मंदिरांपासून शैक्षणिक संस्थांपर्यंत गुरु-शिष्य परंपरेचा सन्मान

Vaibhav Sooryavanshi कडे थेट उपकर्णधारपदाची जबाबदारी! BCCI च्या प्रमुख स्पर्धेत ईशान किशनच्या नेतृत्वात खेळणार

SCROLL FOR NEXT