News about farming sectors after lockdown Nashik Marathi News 
नाशिक

लॉकडाउननंतर सर्वच क्षेत्रांत महागाई, शेतमाल मात्र मातीमोल; शेतकऱ्यांची खंत 

सुभाष पुरकर

वडनेरभैरव (जि. नाशिक) : मागील लॉकडाउननंतर शेती सोडून सर्वच क्षेत्रांतील लोकांनी मालाचा भाव २५ ते ५० टक्के वाढविला आहे. दुचाकी वाहनाच्या २० ते ५० हजारांनी, तर चारचाकीच्या एक ते तीन लाखांनी किमती वाढल्या आहेत. कोरोनाच्या आधी ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये मंदी होती. हीच परिस्थिती सिमेंट, लोखंड, शेती, औजारे, खते, बियाणे, कीटकनाशके व इंधनाच्या बाबतीत आहे. 

लॉकडाउन काळात देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली असताना देशाला सावरणाऱ्या बळीराजाला दुय्यम वागणूक दिली जात आहे. तीन महिन्यांपासून सर्वच भाजीपाला व फळे कवडीमोल भावाने विकला जात आहे. नाशिकमधील शेती दोन दशकात खर्चिक झाली आहे की ती करून ठेवली आहे, हा संशोधनाचा विषय आहे. यावर आधारित बाजारपेठ कोट्यवधीची उलाढाल करत आहे. पण शेतकरी दिवसेंदिवस बॅकफूटवर जात आहे. शेतकऱ्यांना दाखवलेले मृगजळ म्हणजे द्राक्षाला औषध मारा, ब्लोअर घ्या, ती व्हरायटी लावा, विशिष्ट ड्रीप वापरा या सर्व तंत्रज्ञानावर जितका खर्च होत आहे त्याच्या एक टक्काही खर्च कोणी हक्काच्या बाजारपेठेसाठी बाजारभाव मिळावा म्हणून करत नाही. हीच परिस्थिती कांदा व इतर भाजीपाला पिकांची आहे. 
कोणीही द्राक्ष, कांदा किंवा भाजीपाला यांचे भाव पडले म्हणून रास्ता रोको किंवा रेल्वे रोको केला नाही. याबाबत शेतकरीच गंभीर नसेल तर व्यवस्था कशी बदलणार; साधे निर्यातीचे अनुदान चालू करण्यासाठी कोणी आंदोलन केले नाही, अशी खंत शेतकरी व्यक्त करत आहेत. भाव जे कमी झाले ते वाढलेच नाही. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी शेतीत जगातील सर्वात्तम तंत्रज्ञानाचा वापर करतो. ज्याने उत्पादन खर्च अधिक आहे. त्याप्रमाणे बाजारपेठ किंवा बाजारभाव उपलब्ध नसेल तर महाग तंत्रज्ञानाचा वापर करून तयार होणारा शेतमाल किती दिवस कवडीमोल दराने दलालांच्या घशात घालायचा, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. 

महागाई सर्व क्षेत्रांत वाढत असताना शेतीमालाचे भाव मात्र अत्यंत कमी व न परवडणारे आहे. कधी कधी शेतकऱ्याला बाजारपेठेमध्ये स्वतःलाच मालाबरोबर विकून यावे लागते, ही खंत आहे. त्या मुळे उत्पादन खर्च आणि प्रत्यक्षात विक्री, यात मोठी तफावत आहे. हमीभावशिवाय शेतकरी जगूच शकत नाही. इतर उत्पादक त्यांच्या मालाची किंमत ठरवितात; मात्र शेती त्यास अपवाद आहे. 
-बापूसाहेब पाचोरकर, वडनेरभैरव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्री थोडक्यात बचावले, उड्डाण घेताच मागे जाऊ लागलं हेलिकॉप्टर, मोठी दुर्घटना टळली!

IND vs AUS, 1st T20I: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची दणक्यात सुरुवात; पावसाने खोडा घातला, पण सिडनीत विजय मिळवला

Pune: महाशिवरात्री उत्साहाला गालबोट! हरिश्चंद्र गडावर दुर्दैवी घटना, दर्शनाहून परतताना भाविकावर काळाचा घाला

T20 WC, IND vs PAK: अभिषेक शर्माचं कमबॅक होणार, कुलदीप यादवही खेळणार! भारताची पाकिस्तानविरुद्ध कशी असेल प्लेइंग इलेव्हन?

Shashikant Shinde: विलीनीकरण चर्चेस आता पूर्णविराम, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT