नाशिक / घोटी : "साहब, पता नही क्या हो रहा है। काम नही इसलिए खाना नही मिल रहा । घरपर बुढे मॉं-बाप है साहब । उन्हे भी पैसे नही भेज पा रहे है । रोको मत साहब, बस घर जाने दो...', अशी आर्त हाक देत मुंबई येथून पायपीट करीत इगतपुरीत दाखल झालेल्या परप्रांतीयांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
इगतपुरीत आलेल्या परप्रांतीय मजुरांची आर्त हाक
मुंबईवरून थेट इगतपुरी तालुक्यातील विविध भागात परप्रांतीय मजूर घोटी टोल नाका येथे रविवारी (ता. 29) दाखल झाले. मुंबईकडून शेकडो परप्रांतीय मजूर पायी, तसेच मिळेल त्या वाहनांनी आपल्या गावी निघाले होते. दोन दिवसांत तब्बल 145 किलोमीटर अंतर पार केले. यात लहान बालके, महिला, पुरुष होते. इगतपुरी येथे काहींना थांबविण्यात आले, तर काही पायी घोटी टोल नाका येथे आले होते. "काही करून गावी पाठवा', अशी आर्त हाक ते देत होते. घरी म्हातारे आई-वडील यांसह लहान लेकरं असून, ते काळजीत पडले आहेत. मुंबईत मिळेल ते काम करून आपली उपजीविका भागवत होते. मात्र ठेकेदाराने आम्हाला कामावरून काढून दिल्याने जवळ पैसे नाही, खायला काही नाही अशा परिस्थिती त्यांनी भरउन्हात 145 किलोमीटर अंतर पायीच पार केले.
पोलिसांची माणुसकी दिसली..
त्या परप्रांतीय नागरिकांना पोलिसांत माणुसकी दिसली. पोलिसांनी तातडीने स्वखर्चाने बिस्किटे, द्राक्षे, पाणी व बोरटेंभा येथील गुरुद्वार लंगर सेवा मंडळास याची माहिती सांगताच गुरुद्वार सेवा मंडळाने जेवण, नाश्ता व पाण्याची सोय केल्याने ते परप्रांतीय नागरिक काही काळ सुखावले. या वेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे, उपनिरीक्षक आनंदा माळी, हवालदार बिपिन जगताप, धर्मराज पारधी, नितीन भालेराव, भास्कर महाले यांसह गुरुद्वार लंगर सेवा समितीचे बाबा सुखदेवसिंग, जितसिंग, इंदर (विकी) पालसिंग, लबली सिंग, पालसिंग बंगड उपस्थित होते.
हेही वाचा > रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या 'त्या' अनोळखी तरुणाच्या मदतीला देवदूतासारखा धावून आला!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.