0suraj_mandhre_0.jpeg 
नाशिक

''नाशिककरांनो, आगामी पंधरवडा महत्त्वाचा; संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करा''

सकाळवृत्तसेवा

नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांत नाशिककरांसाठी आगामी पंधरा दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे सर्वांनी संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे. 

सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करा

मालेगावमधील दाट लोकवस्तीमुळे रोगाचा प्रसार होण्याची शक्‍यता वाढली आहे. नागरिकांनी परदेश, परराज्य अथवा परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची माहिती तत्काळ प्रशासनास देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. जिल्ह्यात 28 मार्चला पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर आजपर्यंत ही संख्या 13 वर पोचली आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहून घरातच थांबणे गरजेचे आहे. जीवनावश्‍यक किंवा अत्यावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी गेल्यावर गर्दी करणे, विनाकारण लॉकडाउन कालावधीत फिरणे टाळावे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आपल्याकडे उशिराने सुरू झाल्याने अजूनही परिस्थिती नियंत्रणात आहे. आपत्कालीन परिस्थितीत महसूल, पोलिस, आरोग्य, जिल्हा परिषद, महापालिका या सर्व यंत्रणा अतिशय उत्कृष्टपणे उपायोजना करून आपली जबाबदारी पार पाडत आहेत. अशा परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी व सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करावे. 

नियमांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई

मालेगावमध्ये पॉवरलूमचे प्रमाण अधिक असल्याने अनेकांची फुप्फुसांची क्षमता कमी आहे. ज्या ठिकाणी क्षयरोग (टीबी)चे रुग्ण अधिक आहेत अशा ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता असल्याने नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचे पालन करावे. संचारबंदी कालावधीत नियमांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे या सर्व परिस्थितीतून सुखरूपपणे बाहेर पडण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी सांगितले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT