Accidental crash at Devpur branch on Sinner-Shirdi highway.
Accidental crash at Devpur branch on Sinner-Shirdi highway. esakal
नाशिक

SAKAL Special : शिर्डी महामार्गावरील ब्लॅक स्पॉट्सकडे NHAIचे दुर्लक्ष!

अजित देसाई

सिन्नर (जि. नाशिक) : मुंबई व नाशिककडून येणाऱ्या साईभक्तांचा प्रवास सुकर करण्यासाठी सिन्नर ते शिर्डी या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सिन्नरच्या मुसळगाव औद्योगिक वसाहतीपासून पदयात्रांसाठी महामार्गाला समांतर स्वतंत्र पालखी मार्ग बनवण्यात आला आहे.

नावीन्यपूर्ण पद्धतीने हायब्रीड ॲन्युटी मॉडेल्स (हॅम) तत्त्वावर हा महामार्ग बांधण्यात आला असला तरी स्थानिक जनतेच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने या महामार्गावर असंख्य ब्लॅक स्पॉट्स निर्माण झाले आहेत.

महामार्गावर धावणाऱ्या वाहनांचा वेग नियंत्रित करणारी यंत्रणा नसल्याने स्थानिकांना महामार्ग ओलांडायचा म्हटलं, तर जीव धोक्यात घालावा लागत असून, ब्लॅक स्पॉट्सवर होणारे जीवघेणे अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजनांची गरज आहे. (NHAI neglect of black spots on Shirdi highway SAKAL Special nashik news)

सुमारे एक हजार २६ कोटी रुपयांचा हा प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून साकारला जात आहे. सिन्नरच्या गुरेवाडी फाटा येथून मुसळगाव एमआयडीसीतील नीलकमल कंपनीपर्यंत नव्याने बायपास बनवण्यात आला आहे.

मुसळगावपासून सावळीविहीरपर्यंत चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून पायी चालणाऱ्या साईभक्तांसाठी स्वतंत्र पालखी मार्ग बांधण्यात आला आहे. तसेच पालख्यांच्या व साईभक्तांच्या मुक्कामासाठी दातली व पाथरे येथे प्रत्येकी सात कोटींचे अद्ययावत यात्री निवास उभारण्यात आले आहे.

महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असले तरी येथील वाढते अपघात भविष्यात सर्वांचे डोकेदुखी वाढवणारे ठरणार आहेत. गेल्या महिन्यात झालेला खासगी बसचा अपघात किंवा त्याआधी देवपूर फाट्यावर कार पलटी होऊन झालेला अपघात तसेच वावीजवळील फुलेनगर फाट्यावर दुचाकीवरील आई व मुलाचा झालेला मृत्यू.

या घटनांकडे अपघात म्हणून न बघता हे अपघात का झाले, याबाबत विचार मंथन होऊन अशा प्रकारच्या अपघात भविष्यात होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे.

महामार्गावर मुसळगाव औद्योगिक वसाहत, शहापूर, पांगरी, वावी या गावांमध्ये उड्डाणपूल बांधण्यात येऊन गावात अपघात होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली. पाथरे व सावळीविर फाटा येथे स्काय वॉक बांधण्यात आले.

असे असले तरी सिन्नर तालुक्यातून जाणाऱ्या या महामार्गावर असंख्य ब्लॅक स्पॉट आजच निर्माण झाले आहेत. पाथरे येथे पोहेगाव रस्ता, पाथरे बस स्टँड, मलढोण फाटा, मिरगाव फाटा, वावी येथील पाहुणचार हॉटेल, साई भक्त निवास, फुलेनगर फाट्यावर शर्वरी लॉन्स, देवपूर फाटा, भोकणी फाटा, फरदापूर फाटा, खोपडी येथील महानुभाव दत्त मंदिर,

खोपडी गाव, दातली फाटा आदी ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र तयार झाले आहे. या ठिकाणी ‘न्हाई’कडून सुरक्षिततेची खबरदारी घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र वाहनांचा अनियंत्रित वेग अपघातांना निमंत्रण देणारा ठरणार आहे.

वरील ठिकाणी दिशादर्शक फलक पांढरे पट्टे तसेच ब्लिंकर बसवण्यापलीकडे रस्ता ओलांडणाऱ्यांच्या सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे रस्ता प्रशस्त होणार असला तरी अपघातांचे प्रमाणदेखील वाढणार आहे.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

पाथरे येथील बसचा अपघात झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश देऊन या महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्र निश्चित करून त्या ठिकाणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सांगितले होते.

त्यानुसार एमआयडीसी व वावी पोलिसांनी आपापल्या हद्दीतील ब्लॅक स्पॉट्स निश्चित करून त्या संदर्भातील अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास दिला आहे. पोलिसांकडून आलेल्या सूचनांवर महामार्ग प्राधिकरणाकडून रस्ता ओलांडतेवेळी स्थानिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी कार्यवाही होणे गरजेचे आहे.

‘आयआयटी’च्या रिपोर्टकडे बोट....

सिन्नर-शिर्डी महामार्गाच्या रुंदीकरणाआधी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आयआयटीमार्फत पूर्वीच्या महामार्गावर सर्वेक्षण केले होते. त्याआधारे नवीन महामार्गाचे डिझाइन बनवण्यात आले. आयआयटीच्या सूचनेनुसार निर्धारित केलेल्या ठिकाणी महामार्गावर येण्या-जाण्यासाठी जागा सोडण्यात आल्याचे ‘न्हाई’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे करत असताना स्थानिकांच्या होणाऱ्या अडचणी व भविष्यात निर्माण होणारे ब्लॅक स्पॉट्सकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. अपघात घडला किंवा स्थानिकांनी अडचणी मांडल्या की अधिकारी आयआयटीच्या रिपोर्टकडे बोट दाखवतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाच्या जेवणात आढळलं ब्लेड! विमान कंपनीनं मान्य केली चूक

Ravindra Waikar : वायकरांच्या मतदारसंघात खरंच निकाल बदलला का? मतमोजणीच्या दिवशी नेमकं काय घडलं? कीर्तिकरांनी सांगितला घटनाक्रम

Indus Battle Royale: बॅटल रॉयलचे भारतीय व्हर्जन; गेमिंग इंडस्ट्रीत पुण्याची कंपनी ठरणार 'सरताज'

Chhagan Bhujbal : भुजबळांच्या समता परिषदेची बैठक संपली; केंद्र सरकारकडे 'ही' मागणी करण्याचा निर्णय

Sharad Pawar: माकप राज्यात १२ विधानसभा जागावर लढवणार निवडणूक? पावारांंसोबत झाली सकारात्मक चर्चा!

SCROLL FOR NEXT