Fraud esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : मृत आजीच्या जागी बनावट महिलेची ‘एन्ट्री’; न्यायालयात खासगी खटला दाखल

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : तोंडी बक्षीसपत्रावरून मामा-भाच्यात सुरू असलेला वाद भूमीअभिलेख कार्यालयापर्यंत पोहोचला असता, त्या वेळी आजी मृत असताना तिच्या जागी बनावट महिला अपिलाप्रसंगी उभी केल्याने भाच्याने मामाविरोधात न्यायालयात फसवणुकीचा फौजदारी खटला दाखल केला आहे. (niece filed criminal case of fraud in court against uncles nashik crime news)

जुने नाशिकमध्ये गुरफान कुरेशी व त्यांचे मामा मोहम्मद कुरेशी यांच्यात तोंडी बक्षीसपत्रावरून वाद सुरू आहे. सदरील वादासंदर्भात भूमीअभिलेख कार्यालयात अपिलाचे कामकाज सुरू आहे. गुरफान यांचे अपील मंजूर झाले.

दरम्यान, गुरफान यांची आजी व मोहम्मद यांच्या आईचे निधन झाले. असे असतानाही अपिलादरम्यान मृत असाबी मर्द याकूब शेख कुरेशी यांच्या जागी बनावट महिला उभी करून तीच खरी आई असल्याचे मोहम्मद यांनी भासविले.

सदरची बाब गुरफान यांना समजताच त्यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रारही केली; परंतु कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी नाशिक न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला. त्यानुसार फसवणुकीच्या कलमान्वये खासगी खटला दाखल करून घेण्यात आला.

तसेच, न्यायालयाने सरकारवाडा पोलिसांना यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. गुरफान कुरेशी यांच्यातर्फे ॲड. राहुल पाटील यांनी कामकाज पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT