Bribe Crime News esakal
नाशिक

Bribe Crime : निमगाव वाकडा केंद्रातील आरोग्य सेवकास लाच घेताना अटक

सकाळ वृत्तसेवा

लासलगाव (जि. नाशिक) : निफाड येथील जिल्हा उपरुग्णालयात पत्नीची संतती नियमनाची शस्त्रक्रिया करून दिल्याच्या मोबदल्यात एक हजाराची लाच स्वीकारताना निमगाव वाकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवक बळीराम दत्तात्रय शेंडगे यास नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी साफळा रचून अटक केली. (Nimgaon Wakda health worker arrested while taking bribe Nashik Bribe Crime Latest Marathi News)

तक्रारदाराच्या पत्नीची संतती नियमाची शस्त्रक्रिया करून दिल्याच्या मोबदल्यात सोमवारी (ता. १२) एक हजार रुपयाची लाचेची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर तक्रारदाराने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात केलेल्या तक्रारीनंतर बुधवारी (ता. १४) एक हजार रुपये स्वीकारताना शेंडगे यास अटक झाली.

ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, उपअप्पर पोलिस अधीक्षक नारायण न्याहाळदे, पोलिस उपअधीक्षक सतीश भामरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप घुगे, पोलिस निरीक्षक साधना बेळगावकर, हवालदार एकनाथ बाविस्कर, प्रफुल्ल माळी व विनोद पवार यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maha Livestock Insurance Scheme: पशुधन विम्याचा भार होणार हलका; ८५ टक्के अनुदानावर मिळणार विमा

शूटिंगच्या पहिल्या दिवशी मृणाल दुसानिस खूप रडलेली, 'माझिया प्रियाला...' मालिकेबद्दल बोलताना म्हणाली; “ आईकडे पाहत मी रडत होते”

RTOने दंडात्मक कारवाईनंतर कागदपत्रे बराच वेळ दिली नाही, चालकानं समृद्धीवर ट्रकच आडवा लावला; वाहतूक तासभर ठप्प, VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : गृहमंत्री अमित शहा संसदेत निवेदन देणार? 'या' 2 मोठ्या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक, अधिवेशनाचा शेवटचा आठवडा ठरणार वादळी!

BMC: नगरसेवकांना 'अ‍ॅपल'चे टॅब, महापालिकेचा कारभार आता कागदमुक्त होणार

SCROLL FOR NEXT