markandey rishi.jpg 
नाशिक

नऊ महिन्यांनंतर लाभले मार्कंडेय ऋषींचे दर्शन! पर्वतावरील निसर्गसौंदर्य खुलले

दिगंबर पाटोळे

वणी (जि.नाशिक) : ‘हर हर महादेव, बम.. बम.. भोले.. मार्कंडेय ऋषी की जय, सप्तशृंगी माते की जय’चा जयघोष करीत सोमवारी (ता. १४) सोमवती अमावस्येनिमित्त २० हजारांवर भाविक मार्कंडेय पर्वतावर हजेरी लावत मार्कंडेय ऋषींच्या मूर्तीपुढे लीन झाले. 

मार्कंडेय ऋषींच्या मूर्तीपुढे लीन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्च व २० जुलैच्या सोमवती अमावस्येचे मार्कंडेय पर्वतावरील सोमवती यात्रोत्सव प्रशासनाने रद्द केल्याने यात्रोत्सवाची परंपरा खंडित होऊन भाविकांना दर्शनास मुकावे लागले होते. मात्र १६ नोव्हेंबरला दीपावली पाडव्यापासून राज्यातील मंदिर भाविकांना खुले झाल्याने मार्कंडेय पर्वतावर रविवारी (ता. १३) पूर्वसंध्येलाच गुजरातसह धुळे, नगर, नाशिक जिल्ह्यातील शेकडो भाविक दाखल झाले होते. गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण व रविवारच्या पावसामुळे पर्वतावर अधूनमधून येणारे धुके यामुळे पर्वतावरील निसर्गसौंदर्य खुलून गेले होते. सोमवारी पहाटेपासूनच भाविक पर्वताच्या पायथ्याशी मुळाणे बारीत खासगी वाहने व दुचाकींनी दाखल झाल्याने पर्वतावर भाविकांची गर्दी होऊ लागली होती. 

सोमवती अमावस्येनिमित्त पर्वतावर ‘बम बम भोले’चा गजर 
पहाटे मार्कंडेय ऋषींच्या मूर्तीवर अभिषेक महापूजा झाली. सकाळी नऊपासूनच पर्वताच्या शिखरावरील मार्कंडेय ऋषी मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. दरम्यान, पर्वताच्या शिखरावरील दक्षिणमुखी मंदिरात पद्मासनाधिष्ट असलेल्या तेजोमय आश्वासक मार्कंडेय ऋषींच्या मूर्तीच्या दर्शनाने पर्वत चढून आलेल्या भाविकांचा थकलेला चेहरा प्रफुल्लित होत, भक्तिभावाने दर्शन घेऊन भाविक पर्वत उतरत होते. काही भाविक मार्कंडेय ऋषींच्या दर्शनानंतर पर्वत उतरून सप्तशृंगगडाकडे आदिशक्तीच्या दर्शनासाठी जात होते. पर्वताच्या पठारी व मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रसाद, पूजेच्या साहित्याबरोबरच पाणी बॉटल विक्रीची दुकाने ठिकठिकाणी थाटली होती.

सामाजिक अंतर राखणे व मास्कच्या वापराबाबत आवाहन

पर्वतावर मोठ्या प्रमाणावर भाविक पदयात्रेने, तर काही खासगी वाहनांनी आल्यामुळे मुळाणे बारीच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यांवर एक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. तसेच पर्वतावरही मुळाणे बारी, सप्तशृंगगड मार्ग, पिंप्री या तिन्ही बाजूंकडून भाविकांची पर्वत उतरणे व चढण्यासाठी रीघ लागली होती. कळवण पोलिसांनी पर्वताच्या पायथ्याशी व पर्वतावर भाविकांना सामाजिक अंतर राखणे व मास्कच्या वापराबाबत आवाहन करून चोख बंदोबस्त ठेवला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील मुंबई दौरा रद्द करणार? प्रकृतीवर परिणाम; पुढचा निर्णयही सांगितला

पाकिस्तानातील कराचीत गणपती बाप्पा मोरयाचा गजर! मराठी कुटुंबाकडून साजरा केला जातो गणेशोत्सव, आरतीचा VIDEO VIRAL

UPI New Rule 2026 : आता २ हजारांवरील पेमेंटवर शुल्क; पेट्रोल अन् ट्रेन तिकीटासाठी किती चार्ज लागणार?

Marathi News Live Updates : मुंबईत मालिका रुग्णालयात गॅस गळतीने स्फोट, दोघे होरपळले

Rainfall Forecast Maharashtra : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? हवामान विभागाचा पुढील अंदाज चिंताजनक

SCROLL FOR NEXT