rickshaw 1234 acc.jpg 
नाशिक

रिक्षा उलटून नऊ प्रवासी जखमी; चालक फरारी, प्रतापगड फाट्याजवळील घटना 

हंसराज भोये

सुरगाणा (जि. नाशिक) : सुरगाणा येथे आठवडेबाजारानिमित्त आलेल्या उंबरविहीर येथील चालकाचा प्रतापगड फाट्याजवळ नियंत्रण सुटल्याने ऑटो रिक्षा उलटून नऊ प्रवासी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १) घडली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर चालक फरारी झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

अपघातानंतर चालक फरारी
याबाबत माहिती अशी, की सुरगाणा येथे आठवडाबाजारासाठी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक मिळेल त्या वाहनाने येतात. शुक्रवारी आठवडेबाजारासाठी उंबरविहीर येथील नागरिक आले होते. बाजार करून रिक्षाने परतत असताना प्रतापगड फाट्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले. या घटनेत पिलाजी गावित (वय ६८), हरिश्चंद्र गावित (वय २४), दुर्गा गावित (वय १९), परशराम गायवन (वय ५२), सुरेश गवळी (वय ४५), मगजी वाघमारे (वय ५०), श्रीराम भोये (वय ६५) किरकोळ जखमी झाले आहेत. तर परशराम पिठे (वय ६५) व झुणका भोये (वय ५८) यांना गंभीर दुखापत झाली आहे. तर काही जखमींनी घटनास्थळावरून परस्पर घरचा रस्ता धरला. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी सुरेश पांढुर्ले, योगीता जोपळे उपचार करीत आहेत. पोलिस हवालदार साळी घटनेचा तपास करीत असून, फरारी चालकाचे नाव समजू शकलेले नाही. 
 

हेही वाचा - ह्रदयद्रावक! केवळ लेकरासाठीच मातेचे कष्ट अन् धडपड; नियतीचा घाला आला आणि सहा वर्षाचं लेकरू झालं पोरकं

अवैध वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर 
सुरगाणा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध वाहतुकीने डोके वर काढले आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक केली जात असल्याने अपघातांच्या घटना घडत आहेत. बोरगाव ते बर्डीपाडा हा गुजरात महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून, तरुण दुचाकीस्वारांच्या मृत्यूच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यामध्ये अठरा ते तीस वयोगटांतील तरुणांचा समावेश आहे. दर आठवड्यात मृत्यूच्या घटना या रस्त्यावर घडत आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT