killer.jpg
killer.jpg 
नाशिक

नाशिक हादरले! अपहरणानंतर 9 वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या; शेजारीच राहणाऱ्या तरुणाचे कृत्य

सकाळवृत्तसेवा

नाशिक रोड : प्रवाशाला चाकू लावून लुटमारीची घटना पाहिली म्हणून, सामनगाव रोडवरील गाडेकर मळ्यात नऊ वर्षांच्या बालकाला आपला जीव गमावावा लागला. या चिमुरड्याचे अपहरण करून त्याचा खून केल्याप्रकरणी नाशिक रोड पोलिसांनी संशयित विशाल गेजगे याला अटक केली असून, त्याला ५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. तत्पूर्वी संशयिताला अटक करण्याच्या मागणीसाठी उत्तर भारतीय नागरिकांनी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. वाचा नेमके काय घडले?

अशी आहे घटना

गाडेकर मळा येथील लालाबाबू सीताराम यादव यांचा मुलगा रामजी यादव (वय ९) याचे अपहरण व खूनप्रकरणी पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या विशाल विष्णू गेजगे याच्या मुसक्या आवळल्या आहेत. मंगळवारी (ता.१) ओमनी गाडीत संशयिताच्या आईला देण्यासाठी भाजीपाला आणला होता. विशालने रामजी याला ओमिनी गाडीत नेले होते. मात्र, मुलगा घरी आलाच नाही. त्यामुळे लालाबाबू यांनी कामावरून घरी येताच मोटारसायकलद्वारे पोलिस ठाण्यासमोरील टिळक पथ गाठले. तेथे विशालच्या आईकडे विचारणा केली. मात्र, त्यांनी विशाल स्वप्नील वसंत सोनवणे याच्याबरोबर रामजीला ओमिनी गाडीत घेऊन गेला असून, घरमालकाचे किराणा साहित्य घेऊन ते घरी गेले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतरही रात्री उशिरापर्यंत रामजी सापडला नाही.

लूटमार करताना पाहिल्याचे कारण

रात्री दीडच्या सुमारास विशाल ओमिनी गाडी घेऊन घरी आला. त्यास रामजीबाबत विचारणा केली असता मी रामजीला मंदिराजवळ सोडले होते, असे विशालने सांगितले. त्यावरून रात्रभर शोध घेतला, तरीही तो सापडला नाही. त्यानंतर लालाबाबूंनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत, रामजीला पळवून नेल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी विशालला ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी सखोल चौकशी केली असता या दोघांनी माहिती दिली. त्यानुसार रामजी यादवला घेऊन ते ओमिनी कारमधून शिवाजी पुतळा येथे गेले. तेथे एका व्यक्तीला सिन्नरला जायचे आहे का, अशी विचारणा करत गाडीत बसवले. पुढे गेल्यावर स्वप्नीलच्या मदतीने त्या प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून त्याचा मोबाईल व चार हजार रुपये काढून घेतले व तेथून निघून गेले.

खून व लुटीचा गुन्हा दाखल

दरम्यान, हा प्रकार चिमुरड्या रामजीने बघितला होता. त्यामुळे आपले बिंग फुटेल या भीतीने विशालने स्वप्नीलला उतरवत, रामजीला नायगाव रोडने नेऊन तेथे रामजीचा गळा दाबून खून केला. ही माहिती विशालनेच पोलिसांना दिली. त्याच्या विरोधात खून व लुटीचा गुन्हा दाखल झाला असून, न्यायालयाने त्यास ५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याचे नाशिक रोडचे पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांनी सांगितले. तसेच, लुटीच्या प्रकरणात स्वप्नील सोनवणेला अटक झाली आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त मोहन ठाकूर, गणेश न्याळदे, सहाय्यक निरीक्षक शेळके आदींनी घटनास्थळी भेट दिली. संशयित विशालला कडक शासन करण्याची मागणी उत्तर भारतीय नागरिकांनी बिजली यांना भेटून केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT