Nashik Winter Update ( file photo ) esakal
नाशिक

Nashik Winter Update : निफाड 5.6 अंश, नाशिक 9 अंशांवर; राज्‍यात नीचांकी तापमान

वातावरणात वाहणारा गार वारा व पाऱ्यात झालेली घसरण यामुळे थंडीचा तडाखा वाढला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Winter Update : वातावरणात वाहणारा गार वारा व पाऱ्यात झालेली घसरण यामुळे थंडीचा तडाखा वाढला आहे. बुधवारी (ता. २४) निफाडचे किमान तापमान ५.६ अंश सेल्सिअस, तर नाशिकचे किमान तापमान ९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.

यंदाच्‍या हंगामातील हे नीचांकी तापमान आहे. तसेच प्रथमच राज्‍यात नाशिकचे किमान तापमान नीचांकी राहिले आहे. (Niphad 5 degrees and Nashik 9 degrees minimum temperature in state nashik winter update news )

दरम्‍यान, येत्‍या दोन-तीन दिवसांत पारा आणखी घसरून थंडीत वाढ होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. यंदाच्‍या हंगामात खऱ्या अर्थाने थंडीची अनुभूती जानेवारी महिन्‍यात येत आहे. यापूर्वी पाऱ्यात सातत्‍याने चढ-उतार सुरू राहात असल्‍याने कधी थंडी, तर कधी कडक उन्‍हाचा अनुभव नाशिककरांना येत होता.

परंतु गेल्‍या काही दिवसांपासून वातावरणात गारवा परतला असून, सायंकाळनंतर कमालीचा गारठा जाणवू लागला आहे. यापूर्वी नाशिकचे किमान तापमान १६ जानेवारीला ९.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. यंदाच्‍या हंगामातील हे नीचांकी तापमान होते. मात्र थंडीचा तडाखा वाढला असल्‍याने बुधवारी नाशिकचे किमान तापमान ९ अंशांपर्यंत घसरले असून, यंदाच्‍या हंगामातील हे नीचांकी तापमान ठरले आहे.

जिल्ह्यात निफाडमध्ये सर्वाधिक गारठा जाणवतो आहे. या दिवशी निफाडच्‍या तापमानात घसरण होऊन ५.६ अंश सेल्सिअस इतक्‍या किमान तापमानाची नोंद झालेली आहे. यापूर्वीपर्यंत साधारणतः जळगावचे किमान तापमान राज्‍यात नीचांकी राहात होते. परंतु प्रथमच राज्‍यस्‍तरावर किमान नीचांकी तापमान नाशिकचे राहिले आहे.

शेकोट्या पेटायला सुरवात

आतापर्यंत विशेष गारठा जाणवत नसल्‍याने स्‍वेटर, जॅकेटने बचाव होत होता. परंतु सध्या कमालीचा गारठा जाणवत असल्‍याने शहरी, तसेच ग्रामीण भागांमध्ये शेकोट्या पेटू लागल्‍या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT