The maize sown in the area has started to wither due to lack of irrigation
The maize sown in the area has started to wither due to lack of irrigation  esakal
नाशिक

Nashik Agriculture News : महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया पाहतो पावसाची वाट; दुबार पेरणीचे संकट गडद

माणिक देसाई

Nashik Agriculture News : संपूर्ण महाराष्ट्रभर एव्हरग्रीन तालुका म्हणून निफाड तालुक्याची ओळख आहे. गेल्या दोन-तीन वर्षापासून अस्मानी- सुलतानी संकटाशी हा तालुका मुकाबला करत आहे.

अशातच मागील वर्षी खरीप आणि रब्बी दोन्ही हंगाम पाण्यात गेले आहेत. वर्षभर पाऊस पडला, आता पावसाळ्यातच पावसाने डोळे वटारले आहेत.

तालुक्यात जून महिन्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसाने निफाड तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. (niphad Farmers are waiting for heavy rain nashik news)

या पावसाच्या जिवावर पेरणी केली होती. मात्र, पावसाने अचानक ओढ दिल्याने शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. जून महिन्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकरी आनंदात होता.

परंतु आता अनेक दिवसांपासून पावसाने दांडी मारली आहे. त्यामुळे उगवलेली पिके पाऊस नसल्याने सुकू लागली आहेत. परिसरात शेतकऱ्यांनी खरिपाच्या पिकाची लागवड व पेरणी पूर्ण केली. मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या दुष्टचक्रामध्ये शेतकरी सापडला आहे आहेत.

पुरेसा पाऊस न झाल्याने नैसर्गिक संकटाचे सावट तालुक्यावर अद्याप कायम आहे. सध्या ऊनसावलीचा खेळ अन् सोसाट्याचा वारा सुरु आहे. यामुळे शेतकऱ्यांचे काळीज तुटत आहे. गत आठ ते दहा दिवसांपासून रिमझिम पावसाने तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर नैसर्गिक संकटांची टांगती तलवार कायम आहे. यावर्षी तरी निसर्ग आपली अवकृपा दाखविणार नाही, अशी आशा शेतकरी बाळगून आहे.

मात्र, गत आठ दिवसांपासून पाऊस न झाल्याने पिके सुकू लागली आहेत. दरम्यान जुलै महिना संपण्याच्या उंबरठ्यावर आलेला असतानाही मोठा पाऊस पडला नाही. गोदावरी, कादवा, विनिता, बाणगंगा, भुई या नद्यांना अजूनही पूर आलेला नाही. आहे तोच जलसाठाही संपत चालला आहे. विहिरींनी तळ गाठण्याच्या उंबरठ्यावर असताना आता महाराष्ट्राच्या कॅलिफोर्नियाला मोठ्या पावसाचे प्रतीक्षा आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

हा हंगाम तरी निदान चांगला निघावा यासाठी शेतकरी मेहनत करीत आहे, त्याला पावसाची साथ हवी आहे. तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या त्यांची पिके उभी आहेत, परंतु पाऊस झाला नाही तर ती तग धरतील का अशी परिस्थिती आहे. पाऊस झाला नाही तर द्राक्षबागांसह भाजीपाला पिकांचे नियोजन कसे करायचे, खर्च कसा भागवायचा यासह अनंत अडचणींचा डोंगर शेतकऱ्यांपुढे निश्चित उभा आहे.

"जून महिन्याच्या सुरवातीला जो काही थोडासा पाऊस झाला, त्यावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, परंतु त्यानंतर पाऊस न झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. विहिरींनी तळ गाठला, प्यायला देखील पाणी नाही अशी काही परिस्थिती आहे. दोन- चार दिवसात पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीचे संकट आहे. अशा स्थितीत शासनाने मदत करायला हवी." - राजेंद्र सांगळे, माजी सरपंच, तळवाडे, निफाड.

"मागील तीन वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत आला आहे. गतवर्षी वर्षभर पाऊस अन यंदा मात्र आकाशाकडे डोळे लागले आहेत. दोन तीन दिवसांपासून नुसते वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. अजूनही म्हणावा तसा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भरत पडली आहे." - राम राजोळे, करंजगाव, निफाड.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Latest Marathi Live News Update: संसदेची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आजपासून CISF कडं!

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT