Nitesh Rane
Nitesh Rane 
नाशिक

Nitesh Rane on Trimbkeshwar: नितेश राणेंची त्र्यंबकेश्वर मंदिराला भेट; लँड जिहाद सुरु असल्याचा केला आरोप

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : त्र्यंबकेश्वर मंदिरप्रवेशाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी मंदिराला भेट दिली. हिंदूंची बदनामी केली जात असल्याने भेट देण्यासाठी आपण इथं आलो आहोत, असं त्यांनी म्हटलं.

तसेच इथं आमचा शांतता भंग करण्याचा प्रयत्न नाही असं सांगत त्यांनी संजय राऊत यांच्यासह मंदिरात कथित घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्यांना त्यांनी अनेक इशारेही दिले. (Nitesh Rane on Trimbkeshwar issue alleged that land jihad is going on)

राणे म्हणाले, मी आमदार आणि माजी मंत्री म्हणून इथे आलो नाही. या भागातील शांतता भंग करण्याचा आमचा प्रयत्न नाही. १३ मे रोजी घडलेल्या घटनेचा गैरसमज पसरवला गेला. इथं मंदिराच्या दारावर धुप दाखवण्याची अनेक वर्षांची परंपरा असल्याचं सांगत आहेत ते साफ चुकीचं आहे. कारण धूप दाखवण्याची परंपरा ही रस्त्यावरून धूप दाखवण्याची आहे.

हा प्रकार म्हणजे लँड जिहाद असून धार्मिकस्थळी मशीद बांधल्या जात आहेत, असा आरोपही यावेळी नितेश राणे यांनी केला. मुंबईतून हिंदू लोक बाहेर निघून जात आहेत, ब्राह्मण आणि जैन लोक लँड जिहादमुळं चालले आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, भारतीय समाजात दुफळी निर्माण केली जात आहे. त्र्यंबकेश्वरचा प्रकार हा जातीचा नव्हे, दोन धर्माचा आहे. आदिवासी समाजाची इथे मोठी परंपरा आहे. राघोजी भांगरे त्र्यंबक राजाचे दर्शन घेऊन प्रत्येक कामाला सुरुवात करत होते. दिशाभूल करुन धर्मातर केले जाऊ शकते. आदिवासी बांधवांना हात जोडून विनंती धर्मांतर करू नका. नाशिकमध्ये लव जिहादचा प्रकार सुरु आहे, असा आरोप यावेळी माजी मंत्री अशोक उईके यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

Indian Economy: भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी! UNने 2024 साठी जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला

Jalgaon News : दूषित पाण्याच्या नमुन्यांमध्ये लक्षणीय घट; डेंग्यूबाबत आरोग्य यंत्रणेच्या उपाययोजनांना यश

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! पुण्यात कोयत्याने सपासप करुन तरुणाचा टोळक्याकडून खून

परदेशात पळून गेलेला खासदार भारतात आलाच नाही; आता 'रेड कॉर्नर नोटीस' बजावणे हाच एकमेव मार्ग शिल्लक!

SCROLL FOR NEXT