The rescue of the pigeon by the fire department esakal
नाशिक

Nashik News : नाशिककरांना आयुक्तांच्या संवेदनशीलतेचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि त्यांच्या पत्नीची संवेदनशीलता नाशिककरांसह अग्निशामक विभागास अनुभवास मिळाली. एका कबुतराच्या सुटकेसाठी त्यांचे मन कासावीस झाल्याचे दिसून आले. (nmc Commissioner families sensitivity towards animal care Nashik News)

संपूर्ण शहराची जबाबदारी असलेले महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि त्यांच्या पत्नी यांच्या संवेदनशीलतेचा अनुभव बुधवारी (ता. १८) दुपारी नागरिकांना अनुभवास मिळाला. त्या काही कामानिमित्ताने कुलकर्णी गार्डन परिसरात आल्या होत्या.

तेथील एका इमारतीवर असलेल्या फलकाच्या तारेचा फास एका कबुतराला लागला होता. सुटकेसाठी तो तडफडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. क्षणाचाही वेळ न लावता त्यांनी आयुक्तांना फोन लावून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.

त्यांनीदेखील वेळ न घालवता लगेचच अग्निशामक विभागप्रमुखांना घटनेची माहिती दिली. काही वेळात लीडिंग फायरमन एस. बी. निकम, फायरमन इसाक शेख, एस. एन. गांगुर्डे, एस. एफ. फुगट, एच. बी. बेळगावकर, एम. डी. कदम, टी. एस. संत्रस घटनास्थळी दाखल झाले. हूकच्या साह्याने त्यांनी कबुतराची सुटका केली.

त्यानंतर कबुतराने आकाशात उंच भरारी घेतली. महापालिका आयुक्त आणि त्यांच्या पत्नीने दाखविलेल्या संवेदनशीलतेमुळे त्या कबुतराचे प्राण वाचण्यास मदत झाली.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

वन्यजीवांचे संरक्षण महत्त्वाचे

सन्ति निरतं जीव-जगतां प्राण-दाने,

तरु-लतानां विविध-वर्गाः शं दधाने।

वन-गिरि-नदी-पशु-विहङ्गाः

रात्रि-दिन-ऋतु-शशि-पतङ्गाः,

सर्वमास्ते जन-हितार्थं संहतम्।

रक्षति प्रकृतिः सती

सौख्य-राशिं तन्वती

वन्य-सम्पद् रक्षणीया सन्ततम्।

शाश्वतम्, प्रकृति-मानव-सङ्गतम्।।

रिश्ता शाश्वत है

हा पर्यावरणविषयक संस्कृत श्‍लोक आहे. अर्थात, विविध प्रकारचे झाडेझुडपे हे सदैव सजीव प्राण्यांना जीवन, कल्याणामध्ये तत्पर असतात. जंगले, पर्वत, नद्या, प्राणी आणि पक्षी रात्र-दिवस-ऋतू-चंद्र-पतंग, सर्व काही लोकहितासाठी एकत्र ठेवले आहे. निसर्ग स्वच्छतेचे रक्षण करतो. वन्यजीव संसाधनांचे सतत संरक्षण केले पाहिजे. शाश्वत, निसर्ग आणि मनुष्य यांच्याशी सुसंगत नाते शाश्वत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT