नाशिक : देशातील १३२ शहरांमधील प्रदूषण पातळी कमी करण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा (एन- कॅप) योजना जाहीर केली आहे. योजनेत नाशिकचा समावेश करण्यात आल्याने शहरात प्रदूषण वाढत असल्याचे स्पष्ट होते.
त्याच आधारे महापालिकेकडून यांत्रिकी झाडू खरेदी पाठोपाठ पन्नास इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारकडून अर्थसाहाय्य देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. एकूण किमतीच्या वीस टक्क्यापर्यंत अनुदान मिळणार आहे. (NMC financial assistance proposal to central Government for purchase of 50 Electric Buses nashik Latest Marathi News)
महापालिकेकडून शहर बससेवा चालविली जाते. सिटीलिंक नावाने महापालिकेने कंपनीची स्थापनादेखील केली आहे. ८ जुलै २०२१ पासून बससेवेला सुरवात झाली आहे. सध्या २४० बस चालविल्या जातात. यात वीस सीएनजी बस आहे, तर उर्वरित डिझेलवर चालणाऱ्या बस आहेत. केंद्र सरकारने पर्यावरणपूरक बस चालविण्यासाठी फेम - २ योजना आणली होती.
योजनेंतर्गत महापालिकेने पन्नास इलेक्ट्रिक बस घेण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाला सादर केला होतो. फेम योजनेंतर्गत इलेक्ट्रिक बस खरेदीसाठी महापालिकेला प्रतिबस ५५ लाख रुपयांचे अनुदान मिळणार होते. परंतु, केंद्र सरकारने महापालिकेच्या प्रस्तावाची दखल घेतली नाही. त्यामुळे इलेक्ट्रिक बस खरेदी प्रक्रिया गुंडाळण्यात आली.
त्यानंतर आता केंद्र सरकारने २०२४ पर्यंत देशातील १३२ शहरांमधील प्रदूषण पातळी २० ते ३० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (एन-कॅप) आणला आहे. एन-कॅप योजनेत नाशिकचा समावेश करण्यात आला असून, हवा प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून चाळीस कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे.
महापालिकेकडून या अनुदानातून पंचवटीत विद्युत शवदाहिनी तसेच चार यांत्रिकी झाडू खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता त्याचबरोबरच पन्नास इलेक्ट्रिक बस खरेदीला अर्थसाहाय्य मिळावे म्हणून केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे. योजनेंतर्गत २० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
अनुदान मिळण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाची परवानगी बंधनकारक असल्याने प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. अनुदान प्राप्त झाले तरी बसची खरेदी ठेकेदारामार्फतच केली जाणार आहे. जेणेकरून महापालिकेच्या सिटीलिंक कंपनीवर त्याचा बोजा पडणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.