NMC Building esakal
नाशिक

Nashik : महापालिकेचे स्वतःच्याच धोकादायक इमारतीकडे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : पूर्व विभागीय कार्यालय (East Divisional Office) ब्रिटिशकालीन इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावरील दगड खचला आहे. शिवाय पिलर देखील धोकादायक झाला आहे. कर्मचाऱ्यांसह परिसरातील व्यावसायिकांकडून भीती व्यक्त केली जात आहे. इतरांच्या धोकादायक इमारतींना नोटीस बजावणाऱ्या महापालिकेचे (NMC) स्वतःच्याच धोकादायक इमारतीकडे दुर्लक्ष होत असल्याने अशी परिस्थिती उद्भवल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून देण्यात आल्या. (NMC neglects its own dangerous East Divisional Office building Nashik News)

मेनरोड येथे ब्रिटिशकालीन इमारतीत पूर्व विभागीय कार्यालय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या इमारतीच्या देखभाल, दुरुस्तीकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. इमारतीचा विविध भाग धोकादायक झाला आहे. तीन ते चार वर्षांपूर्वी इमारतीच्या मागील भागातील भिंतीचा एक दगड कोसळला होता. शिवाय आत आवारात उभे असलेल्या विभागीय अधिकाऱ्यांच्या वाहनावरदेखील इमारतीचा काही भाग कोसळून नुकसान झाले होते. त्यानंतर इमारतीच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यात आला, असे नाव छापण्याच्या अटीवर अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र अद्यापही कुठल्या प्रकारची दुरुस्ती झालेली नाही.

ब्रिटिशकालीन ठेवा असलेल्या इमारतीची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. असे असताना याच इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावरील मोठा दगड खचला आहे. थोड्याफार आधारावर तो अडकून आहे. शिवाय दगडास लागून असलेला पिलरनेदेखील भिंत सोडली आहे. पिलर आणि भिंत दोघांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे पिलर आणि दगड दोन्ही धोकादायक झाले आहे. मुसळधार पाऊस आल्यास पिलर आणि दगड कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पश्चिम विभागास याबाबतची माहिती दिली. पश्चिम विभाग बांधकाम विभागाचे अधिकारी- कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. दरम्यान, खालच्या ठिकाणी बॅरेकेट उभे केले.

परंतु, केवळ त्यातून समस्या सुटणार नाही. धोकादायक भागाची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. मुख्य प्रवेशद्वार असल्याने विविध कामानिमित्त नागरिकांचे येणे- जाणे आहे. शिवाय परिसरात विविध व्यावसायिकदेखील व्यवसाय करतात. अचानक पिलर किंवा दगड कोसळला, तर दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्वरित धोकादायक भागाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांसह नागरिक, परिसरातील व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: एका षटकाने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला! आपलाच गोलंदाज भारताचा वैरी ठरला; स्मिथपाठोपाठ हॅरी ब्रूकचे शतक

'राणादा' वारकऱ्यांसोबत दंग, स्वत: हाताने केलं अन्नदान, हार्दिक जोशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

SCROLL FOR NEXT