Mechanical Broom esakal
नाशिक

NMC News: नाशिक येथे यांत्रिकी झाडू अखेर कार्यान्वित

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या यांत्रिकी झाडू अखेर कार्यान्वित झाले. मंगळवार (ता.५) पासून शहरातील रस्ते यांत्रिकी झाडूमार्फत साफ करण्यास सुरवात झाली आहे. (NMC News Mechanical sweeper finally operational nashik)

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारकडून महापालिकेला अनुदान प्राप्त झाले आहे. त्या अनुदानापैकी ३३ कोटींचे अनुदान चार यांत्रिकी झाडू खरेदी करण्यासाठी खर्च करण्यात आले. इटली येथून झाडू खरेदी करण्यात आले आहे.

एप्रिल २०२३ मध्ये पुरवठादार कंपनीला कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. ऑक्टोबरअखेर यांत्रिकी झाडू शहरात दाखल झाले. प्रादेशिक परिवहन विभागाने नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता हे झाडू प्रत्यक्षात कार्यरत झाले आहे.

मंगळवारी रात्रीपासून यंत्रामार्फत रस्ते स्वच्छता करण्यास सुरवात झाली आहे. यांत्रिकी झाडू खरेदीसाठी प्रत्येकी २ कोटी ६ लाख रुपये असे एकूण १२ कोटी ३६ लाख रुपये खर्च करण्यात आले आहे.

पुढील पाच वर्षासाठी देखभाल- दुरुस्ती, मनुष्यबळ पुरविणे तसेच इंधन यावर दरमहा ५ लाख ८५ हजार ७०० रुपये खर्च होणार आहे. पाच वर्षासाठी एकूण देखभाल व दुरुस्तीसाठी २१ कोटी आठ लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

अशोकस्तंभ ते गंगापूर गाव, मुंबई नाका ते अशोकस्तंभ, सीबीएस ते कॅनडा कॉर्नर, कॅनडा कॉर्नर ते भोसला मिलिटरी हायस्कूल गेट, त्र्यंबक नाका सिग्नल ते सातपूर गाव, गडकरी चौक ते तिडके कॉलनी, चांडक सर्कल ते मुंबई नाका, महात्मा गांधी रस्ता ते मे रोड, नेहरू गार्डन, शालिमार पंचवटी कारंजा ते रविवार कारंजा या रस्त्यांची स्वच्छता होणार आहे.

दररोज ४० किलोमीटर रस्त्यांची झाडलोट एका झाडूमार्फत होणार आहे. एकूण १६० किलोमीटर रस्ते यांत्रिकी झाडूमार्फत स्वच्छ केले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT