Road repair
Road repair esakal
नाशिक

NMC Road Repair : रस्त्यांचे ऑडिट करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

NMC Road Repair : मागील तीन वर्षात रस्ते डांबरीकरणावर जवळपास साडेसहाशे कोटी रुपये खर्च केले असताना त्याच रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यासाठी १४० कोटींची कामे दिली जाणार आहे.

यामुळे रस्त्यांवर पुन्हा होणाऱ्या या करोडोंच्या खर्चाला माजी महापौर दशरथ पाटील यांनी आक्षेप घेतला असून, रस्त्यांचे ऑडिट करण्याची मागणी केली आहे. (NMC Road Repair Demand for road audit nashik news)

मागील तीन वर्षात नाशिक शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आले. जवळपास साडेसहाशे कोटी रुपये खर्च करूनही रस्त्यांची अवस्था वाईट झाली आहे. एकदा रस्ता तयार केल्यानंतर किमान तीन वर्ष त्या रस्त्यावरील देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असते.

मात्र, नाशिक महापालिकेने तीन वर्ष देखभाल- दुरुस्तीचा विचार न करता १४० कोटी रुपयांची रस्ता दुरुस्तीची कामांची निविदा सूचना जारी केली आहे. रस्ता दुरुस्तीसाठी १०४ कोटी ७४ लाख रुपये तर खडी व मुरूम पुरवठा करण्यासाठी ३५ कोटी रुपयांचा खर्चाचा समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

महापालिका प्रशासनाच्या भूमिकेमुळे शहरात पुन्हा एकदा खड्डेपुराण सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

"मागील तीन वर्षात रस्ते डांबरीकरणात झालेल्या भ्रष्टाचार विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असताना पुन्हा रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली १४० कोटी रुपयांचे कंत्राट देण्याची तयारी केली असून ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली जाणार आहे. नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी होवू देणार नाही."- दशरथ पाटील, माजी महापौर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atala Masjid: भिंतीवर त्रिशूळ, फुले? जौनपूरमधील अटाला मंदीर की मशीद? हिंदुंनी गाठलं कोर्ट, काय आहे संपूर्ण प्रकरण

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

SCROLL FOR NEXT