tap connections esakal
नाशिक

NMC Water Tap Connection: अनधिकृत नळजोडणी नियमितीकरणाचा प्रयोग फसला! 45 दिवस मुदतवाढ देण्याची नामुष्की

सकाळ वृत्तसेवा

NMC Water Tap Connection : पाणी तोटा व गळती रोखण्यासाठी महापालिकेकडून अनधिकृत नळजोडणी नियमितीकरणाचा राबविलेला प्रयोग फसला आहे.

त्यामुळे आता पुन्हा एकदा या उपक्रमाला ४५ दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वीच्या नियोजित कालावधीमध्ये फक्त ३०७ अर्ज दाखल झाले. (NMC Unauthorized tap connection regularization experiment failed Refusal to extend 45 days nashik news)

घरपट्टीप्रमाणेच पाणीपट्टीतील तूट भरून काढण्यासाठी महापालिकेकडून अनधिकृत नळजोडणी नियमित करण्याचा प्रयोग राबविण्यात आला.

त्यामध्ये नागरिकांनी नळजोडणी अधिकृत करण्यासाठी अर्ज केल्यास अनधिकृत जोडणीवर कारवाई न करता ती जोडणी अधिकृत केली जाणार आहे, असे उपक्रमाचे स्वरूप आहे.

शहरांमध्ये जवळपास २५ हजार अनधिकृत नळजोडण्या असण्याची शक्यता पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केली आहे. त्याअनुषंगाने किमान ५० टक्के जोडण्यासाठी अर्ज येईल, अशी अपेक्षा पाणीपुरवठा विभागाला होती.

परंतु मदतीत अवघे ३६० अर्ज प्राप्त झाले. यातील ८५ अर्ज मंजूर झाले, तर उर्वरित अर्जांची छाननी करून मंजुरी दिली जाणार आहे. यापूर्वीची मुदत ९० दिवसांची होती. १५ जूनला ९० दिवस पूर्ण झाले. प्रतिसाद न मिळाल्याने आता पुन्हा ४५ दिवसांची मुदतवाढ दिली जाणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आता तिप्पट दंड

योजनेला ४५ दिवसात प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. त्यानंतरदेखील प्रतिसाद न मिळाल्यास अनधिकृत नळजोडणी शोधून तिप्पट दंड आकारणी केली जाणार आहे. दंडात्मक शुल्क घरपट्टीच्या शुल्कातून वसूल केली जाणार आहे.

४५ दिवसात दंडाची रक्कम न भरल्यास गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३० जुलैपर्यंत अनधिकृत नळजोडणी नियमित करण्यासाठी मुदत असेल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र धारणकर यांनी दिली.

अनधिकृत नळजोडणीसाठी दंड (रुपये)

नळ जोडणी आकार घरगुती बिगर घरगुती व्यावसायिक

१५ मी.मी. ५४०० १९,८०० २४,३००
२० मी.मी. ९,९०० ४७,५२० ५३,४६०
२५ मी.मी. २१,६०० १,१८,८०० १,१६,६४०
४० मी.मी. ६३,००० ३,१६,८०० ३,४७,२००
५० मी.मी. १,१५,२०० ७,९२,००० ६,२२,०८०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT