NMC Nashik News esakal
नाशिक

NMC Bribe Case : लाच प्रकरणात अटक नाही म्हणून नोकरीत रूजू; शिक्षण विभागातील खाबुगिरी पळवाटांना ब्रेक

सकाळ वृत्तसेवा

NMC Bribe Case : राज्याच्या शिक्षण आयुक्तांनीच स्वतःच्या विभागातील ३६ अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. यानिमित्ताने लाच लूचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी होईल.

पण तत्पूर्वीच अनेक धक्कादायक खुलासे पुढे येवू लागले आहेत. लाचखोरीत पकडले जाऊन पळवाटांच्या आधारे निर्दोषत्व प्राप्त करीत पुन्हा मूळ पदावर कार्यरत होणाऱ्या अनेक लाचखोराचा यात समावेश आहे. त्यामुळे चौकशी पत्र राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. (No Arrest in Bribe Case continue Joining Job Break loopholes in nmc education department nashik news)

शिक्षण विभागातील काही महाभागांनी लाच घेतली, लाच प्रकरणात अटकही झाली. पण चोवीस तास कोठडीत राहिला नाही, अशा शुल्लक सबबी दाखवून अनेकांना निलंबित न करता शिक्षण विभागात कायम ठेवण्‍यासारखे प्रकार या निमित्ताने उघडकीस आले.

राज्यभर कायद्यातील पळवाटा किंवा सोयीचे अर्थ लावून अनेक महाभाग पैसे खाऊनही तसेच सेवेत तळ ठोकून असल्याचे प्रकार पुढे येत आहे. निलंबितांना अर्ध्या पगारात कामावर घेण्याचा नियमाचा अनेक जण लाभ घेतात या नियमाचा लाभ घेणारे अनेक जण आहे.

राज्यातील बहुतांश महत्त्वाच्या जिल्ह्यात महत्त्वाच्या पदावर कार्यरत अधिकाऱ्यांची संख्या यात मोठी आहे. एकट्या नाशिकच्या चार ते पाच वरिष्ठ अधिकारी लाच खोरीत पकडले तरी गेले किंवा त्यांची आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशा तरी सुरू आहेत.

राज्यात तीस ते पस्तीसची आसपास अशा अधिकाऱ्यांची संख्या आहे. शिक्षण विभागात अधिकारी लाच घेतांना पकडले जातात.

सगळ्यांनाच अटक होते मात्र असेही काही महाभाग आहे की, ज्यांना अटकेनंतर जामीन मिळाला आणि अटकेचा कालावधी हा चोवीस तासाच्या आतील आहे, अशी सबब सांगूनही अनेकांना खात्याला आणि प्रशासकीय नियमांना चुना लावून कारवायातून पळवाटा काढल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

राज्यातील शिक्षण विभागातील या किस्‍से व संशयास्पद कारर्किद असलेले अधिकारी या सगळ्यांच्याच चौकशा लावल्या आहेत.

शिक्षण विभागात साफसफाई होण्याची आशा

शिक्षण विभागातील चाळीस अधिकारी रडारवर घेत शिक्षण आयुक्तांनी स्वतःच शिक्षण विभागातर्फे पत्र देत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशा लावल्या आहेत. लाच खोरीत पुराव्या अभावी निर्दोष सुटलेले, अशा नानाविध अधिकाऱ्यांच्या चौकशा सुरु केल्याने यंदाच्या शैक्षणिक वर्षात शिक्षण विभागात साफसफाई होण्याची आशा आहे.

"शिक्षण विभागातील ज्या अधिकाऱ्यांची सचोटी आणि चारित्र्य संशयास्पद वाटत आहे. अशा राज्यातील सुमारे ४० अधिकाऱ्यांची खुली चौकशी करावी करण्याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या विभागीय पोलिस अधीक्षकांना पत्र दिले आहे. लाच घेतांना पकडूनही त्यात पळवाटाद्वारे निर्दोष मुक्तता होऊन मूळ पदावर रुजू होतात. याला आळा घालण्यासाठी चुकीच्या वर्तनाबाबत योग्य शिक्षा व्हावी या हेतून पत्र दिले आहे."

- सूरज मांढरे (शिक्षण आयुक्त)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बंगळुरुतून जगभरात वाढवतायत 'ओळख मायबोलीची', देशविदेशातील हजारो विद्यार्थी शिकत आहेत मराठी

Rinku Singh Father Passed Away : क्रिकेटपटू रिंकू सिंगच्या वडिलांचे निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी, नोएडातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

आजचे राशिभविष्य - 27 फेब्रुवारी 2026

Paneer Fried Rice Recipe: उरलेला भात फेकू नका! फक्त 15 मिनिटांत बनवा रेस्टॉरंट-स्टाइल पनीर फ्राइड राइस

Panchang 27 February 2026: आजच्या दिवशी देवी कवच स्तोत्राचे पठण आणि ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT