dada bhuse 1.jpg 
नाशिक

''राज्यातील एकही शेतकरी बियाणे व खतांपासून वंचित राहणार नाही''

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (मालेगाव) कृषी विभागामार्फत मुबलक प्रमाणात बियाणे व खतांच्या बफर स्टॉकचे वितरण शेतकऱ्यांना बांधावर वितरित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील एकही शेतकरी बियाणे व खतापासून वंचित राहणार नाही, असे प्रतिपादन कृषिमंत्री दादा भुसे यांनी दाभाडी (ता. मालेगाव) येथे शुक्रवारी (ता. 5) केले. 

राज्यात मुबलक खते, बियाणे 

कृषिमंत्री दादा भुसे यांनी, कोरोनासारख्या महामारीसोबतच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांसमोर एकापाठोपाठ एक संकटे येत आहेत. अशा संकटांचा सामना करण्यासाठी शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. संपूर्ण राज्याचा दौरा करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या असून, त्यावर कृषी विभागामार्फत आवश्‍यक उपाययोजना आखण्यात येत आहेत. सामूहिक शेततळे, कांदाचाळ, पॅक हाउस, शेडनेट यांसारख्या योजना राबवून शेतकऱ्यांसाठी ठिबक व फळबागाच्या अनुषंगाने दिलासा देण्याचे काम शासनामार्फत सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. श्री. देवरे यांनी योजनेची माहिती दिली. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत दाभाडी गावात विविध ठिकाणी अकराशे रोपण करण्यात आले.  

दाभाडी येथे श्‍यामप्रसाद मुखर्जी रुरबन मिशनअंतर्गत लाभार्थ्यांना योजनेच्या कार्यारंभ आदेशाचे वाटप श्री. भुसे यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, सरपंच चारुशीला निकम, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, तालुका कृषी अधिकारी अशोक पवार, अशोक निकम, दिलीप निकम, शिवाजी हिरे आदींसह शेतकरी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT