Disabled Person  esakal
नाशिक

Nashik News : ‘RFID’ कार्ड नसल्यास दिव्यांगांना मोफत प्रवास बंद

महापालिकेकडून चालविल्या जाणाऱ्या सिटीलिंक बसमध्ये दिव्यांगांना मोफत प्रवास करण्यासाठी आरएफआयडी कार्ड बंधनकारक असून कार्ड नसल्यास मोफत बस प्रवास करता येणार नसल्याचे सिटीलिंक प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महापालिकेकडून चालविल्या जाणाऱ्या सिटीलिंक बसमध्ये दिव्यांगांना मोफत प्रवास करण्यासाठी आरएफआयडी कार्ड बंधनकारक असून कार्ड नसल्यास मोफत बस प्रवास करता येणार नसल्याचे सिटीलिंक प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (No free travel for disabled person without RFID card in citylink bus nashik news)

नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या सिटीलिंक-कनेक्टिंग नाशिक बससेवेकरिता नियमित प्रवास करणाऱ्‍या प्रवाशांसाठी सवलतीच्या दरात विविध पास आहेत.

दिव्यांगांना प्रवासाकरिता मोफत कार्ड दिले जाते. सिटीलिंककडून पासधारक प्रवाशांकरिता साध्या पासऐवजी अत्याधुनिक आरएफआयडी कार्डचे वितरण करण्यात येत आहे. या कार्डचे वितरण यापूर्वीच सुरू करण्यात आले आहे.

नवीन वर्षापासून म्हणजेच १ जानेवारीपासून सिटीलिंक बसमधून प्रवास करतेवेळी आरएफआयडी कार्ड जवळ बाळगणे क्रमप्राप्त आहे. अन्यथा बसमधून दिव्यांग बांधवांना मोफत प्रवासाचा लाभ घेता येणार नाही. दिव्यांगांनी कार्ड काढून घ्यावे.

मोफत प्रवासाचा लाभ घ्यावा. सिटीलिंक भवन, वीर सावरकर जलतरण तलाव समोर, त्र्यंबक रोड येथील पास केंद्रावर सदर कार्डचे वितरण करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT