suraj mandhare nashik. 
नाशिक

जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी ‘नो मास्क, नो एन्ट्री’ नियम अनिवार्य; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पाहा VIDEO

विनोद बेदरकर

नाशिक : दिवाळीच्या खरेदीसाठी लोक रस्त्यावर उतरल्याने कोरोनाची संभाव्य दुसरी लाट टाळण्यासाठी प्रशासन सजग झाले आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शहर आणि जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी ‘नो मास्क, नो एन्ट्री’ हा नियम अनिवार्य केला असून, मास्क नसताना दुकानात प्रवेश केल्यास कारवाई होणार आहे. 

कलम १४४ लागू

नाशिक जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कार्यरत आहे. प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली दिवाळी खरेदीनिमित्त होणाऱ्या गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर कोविड प्रतिबंधित उपाययोजनांबाबत प्राधिकरणाची बैठकीत ‘नो मास्क, नो एन्ट्री’चा निर्णय घेण्यात आला. बैठकीत प्राधिकरणाने संभाव्य उपाययोजना राबविताना नाशिक शहरात फौजदारी दंडप्रक्रिया संहितेनुसार कलम १४४ लागू केला आहे. आठवडेबाजार, जनावरांचे बाजार सुरू ठेवताना बाजारात कोरोना प्रतिबंधासाठी सामाजिक अंतर, मास्कचा वापर आदी नियम संबंधितांवर बंधनकारक असणार आहेत. 

कंटेन्मेंट झोनमध्ये फटाकेबंदी 

सगळीकडे दिवाळीच्या खरेदीला वेग आला आहे. आगामी काळात कोरोना संसर्गाची संभाव्य लाट येण्याची भीती वर्तविली जात असताना दिवाळीत वायू प्रदूषणाबाबत दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. संसर्गात वाढ टाळण्यासाठी वायूप्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर नियंत्रण आणले आहे. कंटेन्मेंट झोन आणि शांतता क्षेत्रात (रुग्णालय, न्यायालय, शाळा आदी), सार्वजनिक ठिकाणी मंगळवार (ता. १०)पासून वायूप्रदूषण करणारे कोणतेही प्रकारचे फटाके वाजविण्याला पूर्णतः प्रतिबंध करण्यात आला आहे. 

- सार्वजनिक ठिकाणी ‘नो मास्क, नो एन्ट्री’ 
- कंटेन्मेंट झोनमध्ये फटाक्यास प्रतिबंध 
- शहर-जिल्ह्यात कलम १४४ लागू 
- अंतर राखून आठवडेबाजारांना परवानगी 


नाशिक शहर-जिल्ह्यात ‘नो मास्क, नो एन्ट्री़’ हा नियम सर्व सार्वजनिक ठिकाणी अनिवार्य करण्यात येत आहे. त्यासंदर्भातील आदेश निर्गमित करण्यात येत आहेत. 
-सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT