sakal
नाशिक

Maharashtra Rain Crisis : राज्यातील 216 महसूल मंडळांमध्ये 21 दिवसांपेक्षा अधिक पावसाची हुलकावणी

सकाळ वृत्तसेवा

Maharashtra Rain Crisis : पावसाच्या हुलकावणीमुळे काही भागातून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अशात, कृषी विभागाने पीक परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

त्यात राज्यातील ७९ तालुक्यांतील २१६ मंडळांमध्ये २१ दिवसांहून अधिक पावसाने खंड दिल्याचे स्पष्ट झाले. १५ ते २१ दिवसांचा पावसाचा खंड १७७ तालुक्यांतील ५२८ मंडळांमध्ये राहिला आहे. शिवाय, १५ तालुक्यांत २५ ते ५० टक्क्यांपर्यंत पावसाची नोंद झाली आहे. (no rainfall for in 216 revenue circles of state maharashtra rain crisis news)

राज्यात १ जून ते २१ ऑगस्ट या कालावधीतील सरासरी पाऊस ७३२.२ मिलिमीटर असून, प्रत्यक्षात ८९ टक्के म्हणजे, ६५१.१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जूनमध्ये ५३.६०, जुलैमध्ये १३८.७०, तर ऑगस्टमध्ये २१ दिवसांत ४१.७० टक्के पाऊस झाला आहे.

२५ ते ५० टक्के पाऊस झालेले तालुके जिल्हानिहाय असे : नाशिक- सिन्नर, चांदवड, नांदगाव. नंदुरबार- नंदुरबार. अहमदनगर-श्रीरामपूर, राहुरी. पुणे- बारामती, पुरंदर, हवेली. सातारा- कोरेगाव, फलटण. सांगली- कडेगाव, खानापूर, विटा. कोल्हापूर- राधानगरी. अमरावती- दर्यापूर.

१५ जिल्ह्यात ५० ते ७५ टक्के पाऊस

नाशिक, धुळे, नंदुरबार, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, अकोला, अमरावती या १५ जिल्ह्यांत ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, सोलापूर, धाराशिव, हिंगोली, बुलढाणा, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत ७५ ते १०० टक्के पाऊस झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शंभर टक्क्यांहून अधिक पावसाचे सात जिल्हे राहिले. त्यात ठाणे, रायगड, पालघर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश आहे. दरम्यान, राज्यात एक कोटी ४२ लाख दोन हजार सर्वसाधारण क्षेत्रापैकी एक कोटी ३८ लाख चार हजार म्हणजेच ९७ टक्के क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील पावसाचा खंड

जिल्ह्याचे नाव १५ ते २१ दिवस खंड २१ दिवसांपेक्षा अधिक खंड

महसूल मंडळ संख्या तालुक्यांची संख्या महसूल मंडळ संख्या

अहमदनगर ४० ११ ४२

नाशिक १६ ५ १५

जळगाव १९ ५ १०

धुळे ६ ० ०

नंदुरबार १ ० ०

राज्य एकूण ५२८ ७९ २१६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT